दुसऱ्या टेस्ट सामन्याच्या पहिल्या सेशनमध्य़े कर्णधार शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल मैदानावर होते. या दरम्यान स्टेडियममधील एका तरूणीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या तरूणीने मैदानात "आय लव्ह यू शुभमन" असे लिहिलेले फलक झलकवलेले होते. या तरूणीला कॅमेरामॅनने कॅमेरात कैद करताच स्टेडियममधील गर्दी टाळ्यांचा कडकडाट करत होती आणि प्रसारकाने लगेचच या हलक्याफुलक्या क्षणाला हायलाइट केले, ज्यामुळे तिचा फोटो व्हायरल झाला. काही मिनिटांतच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर #ILoveYouShubman या ट्रेंडिंग हॅशटॅगखाली पोस्ट, मीम्स आणि प्रतिक्रियांचे भर पडू लागले.
advertisement
या छोट्याशा घटनेने भारत आणि वेस्ट इंडिजमधील दुसरा कसोटी सामना आणखी रोमांचक बनवला. शुभमन गिल कसा वाढत्या प्रमाणात लोकप्रिय आणि चाहत्यांचा आवडता होत आहे हे देखील यातून स्पष्ट झाले. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी गिलने शानदार कामगिरी करत रोहित शर्माला मागे टाकत भारतीय कसोटी कर्णधार म्हणून सर्वाधिक शतके करण्याच्या एमएस धोनीच्या विक्रमाशी बरोबरी केली.
26 वर्षीय गिलने फलंदाजीतून आपला प्रभावी फॉर्म कायम ठेवला आणि कर्णधार म्हणून त्याचे पाचवे शतक झळकावले. त्याने एका कॅलेंडर वर्षात कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक शतके करण्याच्या भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी केली. गिल पहिल्या डावात 196 चेंडूत नाबाद 129 धावा करत 16 चौकार आणि दोन षटकार मारले.भारताने 5 बाद 518 धावांवर डाव घोषित केला.
वेस्ट इंडिजचा डाव कोसळला
वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावाची सूरूवात चांगली झाली नव्हती.कारण सलामीवर जॉन कॅम्पेबल 10 धावांवर आणि चंद्रपॉल 34 धावांवर बाद झाला. त्याच्यानंतर अलिक अखानाझेने वेस्ट इंडिजची धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला, पण तो देखील 41 धावावर बाद धाला. त्यानंतर शाई होप 31 धावांवर बाद झाला. रॉस्टन चेस शुन्यावर बाद झाला. टेविन इमलाच 14 वर खेळत आहे. वेस्ट इंडिजचा पहिला डाव ४ विकेट गमावून 140 धावापर्यंत पोहोचला आहे.