TRENDING:

IND vs AUS : मला वनडे खेळायचंय, पण गिलने आधीच सांगितल 'तुझी जागा नाही', वर्ल्ड नंबर 1 प्लेयरचा गौप्यस्फोट

Last Updated:

भारताच्या एका वर्ल्ड नंबर 1 खेळाडूने वनडे खेळायची इच्छा व्यक्त केली आहे.पण त्याला कर्णधार शुभमन गिलने आधीच सांगितलेल. 'तुझी जागा नाही'..त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधीच स्टार खेळाडूने गौप्यस्फोट केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
India Vs Australia : येत्या 19 ऑक्टोबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला सूरूवात होणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर झाला आहे. हा संघ जाहीर झाल्याच्या काही दिवसानंतर आता भारताच्या एका वर्ल्ड नंबर 1 खेळाडूने वनडे खेळायची इच्छा व्यक्त केली आहे.पण त्याला कर्णधार शुभमन गिलने आधीच सांगितलेल. 'तुझी जागा नाही'..त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधीच स्टार खेळाडूने गौप्यस्फोट केला आहे. या खेळाडूच्या विधानाची आता चर्चा रंगली आहे.
IND vs AUS
IND vs AUS
advertisement

हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून टीम इंडियाचा ऑलराऊंडर रविंद्र जडेजा आहे.रविंद्र जडेजा सध्या जगभरातील ऑलराऊंडर खेळाडुंच्य यादीत अव्वल स्थानी आहे. रविंद्र जडेजा सध्या वेस्ट इंडिज विरूद्ध शेवटचा टेस्ट सामना खेळतो आहे. या सामन्यानंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात टीम इंडिया तीन वनडे आणि पाच सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे.या दौऱ्यात रविंद्र जडेजाची निवड झाली नाही आहे. त्यामुळे तो प्रचंड नाराज असल्याची चर्चा आहे.

advertisement

दरम्यान आज वेस्ट इंडिज विरूद्धच्या दुसऱ्या टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी रविंद्र जडेजा म्हणाला की,मला वनडे क्रिकेट खेळायचं आहे. पण ते माझ्या हातात नाही आहे. शेवटी, संघ व्यवस्थापन, कर्णधार आणि प्रशिक्षक एका विशिष्ट पद्धतीने विचार करतात. ते (गिल-गंभीर) माझ्याशी बोलले होते,त्यामुळे संघाची घोषणा झाल्यानंतर आश्चर्य वाटण्यासारखं काही नव्हतं. कारण कर्णधार, निवडकर्त्या आणि प्रशिक्षकांनी मला त्यांच्या विचारांबद्दल माहिती दिली होती, असे रविंद्र जडेजाने सांगितले. याचाच अर्थ रविंद्र जडेजा आधीच सांगितलं गेलेल तुझ्यासाठी संघात जागा नाही आहे.

advertisement

रविंद्र जडेजा पुढे 2027 वर्ल्ड कपवरही बोलला, तो म्हणाला जर मला वर्ल्ड कपमध्ये खेळण्याची संधी मिळाली तर ते स्पर्धेपूर्वीच्या सामन्यांवर अवलंबून असेल आणि जर मी त्यात चांगली कामगिरी केली तर ते चांगले होईल. गेल्या वेळी आम्ही जवळ आलो होतो पण तो हुकला, त्यामुळे ते अपूर्ण काम असेल,असेही त्याने सांगितले.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताचा वनडे संघ :

advertisement

शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार) अक्षर पटेल, के एल राहुल, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर) यशस्वी जयस्वाल

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताचा टी20 संघ :

सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुभमन गिल (उपकर्णधार) तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (विकेटकीपर) वरुन चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, हर्षदीप राणा, संजू सॅमसन (विकेटकीपर) रिंकु सिंग, वॉशिंग्टन सुंदर

advertisement

भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक

वनडे मालिका

१९ ऑक्टोबर: पहिला एकदिवसीय सामना, पर्थ

२३ ऑक्टोबर: दुसरा एकदिवसीय सामना, अॅडलेड

२५ ऑक्टोबर: तिसरा एकदिवसीय सामना, सिडनी

टी 20 मालिका

२९ ऑक्टोबर: पहिला टी२०, कॅनबेरा

३१ ऑक्टोबर: दुसरा टी२०, मेलबर्न

२ नोव्हेंबर: तिसरा टी२०, होबार्ट

६ नोव्हेंबर: चौथा टी२०, गोल्ड कोस्ट

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर दबावातच, आजही भाव वाढ नाहीच, कारण काय?
सर्व पहा

८ नोव्हेंबर: पाचवा टी२०, ब्रिस्बेन

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs AUS : मला वनडे खेळायचंय, पण गिलने आधीच सांगितल 'तुझी जागा नाही', वर्ल्ड नंबर 1 प्लेयरचा गौप्यस्फोट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल