खरंच शुभमनची चूक होती का?
यशस्वीच्या रुपात टीम इंडियाचा तिसरा विकेट गेला. यशस्वी 258 बॉलवर 22 फोरसह 175 धावा काढल्यानंतर बाद झाला. वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या दिवशी भारताने 2 बाद 318 धावांवर आपला डाव पुन्हा सुरू केला, परंतु संघाने लवकरच यशस्वीची विकेट गमावली. धाव घेण्याचा निर्णय यशस्वीचा होता आणि तो पुढे गेला, परंतु गिलच्या 'चुकीने' त्याला द्विशतक गमवावं लागलं, अशी चर्चा सोशल मीडियावर होतीये. पण खरंच शुभमनची चूक होती का?
advertisement
शुभमनने धाव घेतली नाही
यशस्वीने मिड ऑनच्या दिशेने बॉल मारला. त्यामुळे रन घेयचा की नाही, हे स्ट्राईकवर असलेल्या खेळाडूचा कॉल असतो. यशस्वीने पळ म्हणून घाई केली अन् शुभमनने धाव घेतली नाही. यशस्वी जरी पाळाला असता तरी देखील नॉन स्ट्राईक एन्डवर पोहोचला नसता. तसेच शुभमन देखील स्ट्राईकवर पोहोचला नसता. त्यामुळे धाव नसताना यशस्वी का पळाला? असा सवाल विचारला जात आहे.
ड्रेसिंग रूममध्ये शांतपणे बसला
दरम्यान, यशस्वी त्याच्या बाद झाल्यावर खूप निराश दिसत होता आणि काही काळ गिलवर रागही व्यक्त करत होता. शेवटी, तो निराश होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला आणि ड्रेसिंग रूममध्ये शांतपणे बसलेला दिसला. त्यामुळे आपलीच चूक होती, याची जाणीव त्याला झाली असावी.