यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल यांनी टीम इंडियाला 58 रनची ओपनिंग पार्टनरशीप करून दिली, पण राहुल 38 रनवर माघारी परतला. यानंतर जयस्वालने साई सुदर्शनसोबत 193 रनची पार्टनरशीप केली. साई सुदर्शनचं शतक फक्त 13 रननी हुकलं. 165 बॉलमध्ये 87 रन करून साई सुदर्शन आऊट झाला. वेस्ट इंडिजकडून दोन्ही विकेट जोमेल वारिकन याला मिळाल्या.
advertisement
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या 2 टेस्ट मॅचच्या सीरिजमधील ही शेवटची टेस्ट आहे. याआधी अहमदाबादमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा इनिंग आणि 140 रननी पराभव झाला होता, त्यानंतर आता दिल्ली टेस्टमध्येही विजय मिळवून वेस्ट इंडिजला व्हाईट वॉश करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. पहिल्या टेस्टमध्ये विजय मिळवलेल्या प्लेयिंग इलेव्हनसोबतच टीम इंडिया दुसऱ्या टेस्टमध्येही मैदानात उतरली आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातली ही सीरिज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या सत्राचा भाग आहे, त्यामुळे दोन्ही टेस्टमध्ये विजय मिळवून पॉईंट्स टेबलमध्ये वरच्या क्रमांकावर जायची संधी भारतीय टीमला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या पॉईंट्स टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे.
भारताची प्लेयिंग इलेव्हन
यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज