IND w vs AUS w : आयसीसीच्या वु्मेन्स वर्ल्ड कप सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रोमांचक सामना सूरू आहे. हा सामना जवळपास ऑस्ट्रेलियाच्या पारड्यात गेला आहे,असे असताना ऑस्ट्रेलियाच्या एलिस पेरीने मैदान सोडलं आहे. तिने अशावेळी मैदान सोडलं आहे ज्यावेळी ऑस्ट्रेलिया विजयाच्या उंबरठ्यावर आहे,त्यामुळे मैदानात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.त्यामुळे मैदानात नेमकं काय घडलं आहे? हे जाणून घेऊयात.
advertisement
खरं तर ऑस्ट्रेलियाच्या एलिसा हिलीने 80 धावा ठोकल्या होत्या, तर तिच्या सोबत एलिस पेरीने 32 धावा केल्या होत्या.या दरम्यान ऑस्ट्रेलियाचा डाव 1 विकेट गमावून 154 धावांपर्यंत पोहोचला होता.त्यामुळे इथून पुढे हे दोन्हीही खेळाडू ऑस्ट्रेलियाला सामना जिंकवून देतील असे वाटत होते.या दरम्यान सामन्यात ट्वि्स्ट आला.
त्याचं झालं असं की एलिस पेरीला खेळता खेळता अचानक अडचण आली होती. शेवटच्या ड्राईव्हमुळे पेरीला अडचण आली.तिने फ्रंट हॅमीवर जास्त ताण दिला आणि ती निघून गेली. ती रीटार्यड आऊट होत मैदानाबाहेर गेली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला.
दरम्यान एलिस पेरी मैदानाबाहेर जाताच तिच्याजागी बेथ मूनी मैदानात आली होती. पण ती फारकाळ मैदानात टीकू शकली नाही आणि 4 धावा करून बाद झाली. त्यानंतर अॅनाबेल सुथरलँड शून्य धावावर बाद झाली.त्यामुळे आता अॅश्ले गार्डर मैदानात उतरली आहे. तर सलामीवीर एलिसा हिलीने शतक ठोकलं आहे. ती आता 110 धावांवर खेळते आहे.
भारताचा पहिला डाव
ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे टीम इंडिया प्रथम फलंदाजीला उतरली होती.यावेळी टीम इंडियाकडून स्मृती मांनधना आणि प्रतिका रावलने चांगली सूरूवात केली होती. दोघींमिळून 155 धावांची पार्टनरशीप केली होती.या दरम्यान स्मृती मंधाना 80 धावा करून बाद झाली होती. या खेळीत तिने 3 षटकार आणि 9 चौकार लगावले होते. स्मृतीच शतक हुकलं त्यामुळे प्रतिका रावल तरी शतक ठोकेल अशी आशा होती पण ती देखील 75 धावांवर बाद झाली.या दरम्यान तिने 1 षटकार आणि 10 चौकार लगावले होते.
हे दोन्ही खेळाडू जेव्हा मैदानात होते तेव्हा भारताच स्कोर 200 च्या नजीक होता. त्यानंतर हरलीन देओलने 38 धावा, कर्णधार हरमनप्रीत कौरने 22 धावा, जेमीमा रॉड्रीक्सने 33 धावा, रिचा घोषने 32 धावा, अमनज्योत कौरने 16 धावा केल्या होत्या.बाकी इतर खेळाडू एकेरी धावा करून बाद झाले.
खरं तर टीम इंडिया चांगल्या स्थितीत खेळत होती पण शेवटच्या क्षणी 36 धावांमध्ये 6 विकेट पडल्या होत्या. त्यामुळे भारताचा डाव 48.5 ओव्हरमध्ये 330 धावांवर ऑलआऊट झाला होता.त्यामुळे टीम इंडियाला ही चूक महागात पडू शकते.
ऑस्ट्रेलियाकडून अॅनाबेल सुथरलँडने 5 विकेट घेतल्या होत्या. तर सोफीने 3 आणि मेगन स्कट आणि अॅश्ले गार्डरने प्रत्येकी 1 विकेट घेतल्या होत्या. आता ऑस्ट्रेलियासमोर 331 धावांचे आव्हान आहे.आता ऑस्ट्रेलिया हे आव्हान पुर्ण करते की टीम इंडिया त्यांना रोखते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.