TRENDING:

स्मृती-प्रतिका जोडीने धू धू धुतलं, 300 करूनही टीम इंडियाला 'ही' चूक महागात पडणार, ऑस्ट्रेलिया मॅच फिरवणार?

Last Updated:

टीम इंडियाने 330 धावा ठोकल्या आहेत. खरं तर टीम इंडिया याहून अधिकच्या धावा ठोकू शकली असती पण शेवटच्या क्षणी मोठी चूक घडली. ही चूक टीम इंडियाला महागात पडणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
India w vs Australia w : आयसीसी वुमेन्स वर्ल्डकपच्या आजच्या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाची प्रचंड धुलाई केली आहे. टीम इंडियाकडून प्रतिका रावलने 75 आणि स्मृती मंधानाने 80 धावांची अर्धशतकीय खेळी केली आहे. या धावांच्या बळावर टीम इंडियाने 330 धावा ठोकल्या आहेत. टीम इंडियाची वनडे वर्ल्डकपमधली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. जरी ही सर्वोच्च धावसंख्या असली तरी टीम इंडिया याहून अधिकच्या धावा ठोकू शकली असती पण शेवटच्या क्षणी मोठी चूक घडली. ही चूक टीम इंडियाला महागात पडण्याची शक्यता आहे. यामुळे ऑस्ट्रेलियाकडे मॅच फिरवण्याची संधी आहे.
IND W vs AUS W
IND W vs AUS W
advertisement

ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे टीम इंडिया प्रथम फलंदाजीला उतरली होती.यावेळी टीम इंडियाकडून स्मृती मांनधना आणि प्रतिका रावलने चांगली सूरूवात केली होती. दोघींमिळून 155 धावांची पार्टनरशीप केली होती.या दरम्यान स्मृती मंधाना 80 धावा करून बाद झाली होती. या खेळीत तिने 3 षटकार आणि 9 चौकार लगावले होते. स्मृतीच शतक हुकलं त्यामुळे प्रतिका रावल तरी शतक ठोकेल अशी आशा होती पण ती देखील 75 धावांवर बाद झाली.या दरम्यान तिने 1 षटकार आणि 10 चौकार लगावले होते.

advertisement

हे दोन्ही खेळाडू जेव्हा मैदानात होते तेव्हा भारताच स्कोर 200 च्या नजीक होता. त्यानंतर हरलीन देओलने 38 धावा, कर्णधार हरमनप्रीत कौरने 22 धावा, जेमीमा रॉड्रीक्सने 33 धावा, रिचा घोषने 32 धावा, अमनज्योत कौरने 16 धावा केल्या होत्या.बाकी इतर खेळाडू एकेरी धावा करून बाद झाले.

खरं तर टीम इंडिया चांगल्या स्थितीत खेळत होती पण शेवटच्या क्षणी 36 धावांमध्ये 6 विकेट पडल्या होत्या. त्यामुळे भारताचा डाव 48.5 ओव्हरमध्ये 330 धावांवर ऑलआऊट झाला होता.त्यामुळे टीम इंडियाला ही चूक महागात पडू शकते.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर दबावातच, आजही भाव वाढ नाहीच, कारण काय?
सर्व पहा

ऑस्ट्रेलियाकडून अॅनाबेल सुथरलँडने 5 विकेट घेतल्या होत्या. तर सोफीने 3 आणि मेगन स्कट आणि अॅश्ले गार्डरने प्रत्येकी 1 विकेट घेतल्या होत्या. आता ऑस्ट्रेलियासमोर 331 धावांचे आव्हान आहे.आता ऑस्ट्रेलिया हे आव्हान पुर्ण करते की टीम इंडिया त्यांना रोखते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
स्मृती-प्रतिका जोडीने धू धू धुतलं, 300 करूनही टीम इंडियाला 'ही' चूक महागात पडणार, ऑस्ट्रेलिया मॅच फिरवणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल