टेस्ट करियरमधील 10 वं शतक पूर्ण
पहिल्या डावात भारताकडून युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल याने सर्वाधिक 175 धावांची दमदार इनिंग खेळली, मात्र तो रन-आऊट झाल्याने त्याची खेळी संपुष्टात आली. काल बचावात्मक खेळणारा गिल आज अधिक प्रवाही फलंदाजी करताना दिसला आणि त्याने आपल्या टेस्ट करियरमधील 10 वं शतक पूर्ण केलं. युवा फलंदाज साई सुदर्शन कालच्या दिवशी केवळ 13 धावांनी आपलं पहिले टेस्ट शतक हुकलं. आज नितीश कुमार रेड्डी आणि ध्रुव जुरेल यांनी जलद गतीची फलंदाजी करत भारताची धावसंख्या 500 च्या पार नेली.
advertisement
WTC च्या इतिहासात भारतासाठी सर्वाधिक धावा
शुभमन गिलने 10 वं शतक ठोकत मोठा विक्रम नावावर केला आहे. शुभमन गिल याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्सशीपच्या इतिहासात भारताकडून सर्वाधिक शतकं ठोकण्याचा मान नावावर केला आहे. त्याआधी रोहित शर्माच्या नावावर 9 शतकांचा रेकॉर्ड होता. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (WTC) इतिहासात भारतासाठी सर्वाधिक धावा शुभमन गिलने केल्या आहेत, ज्यांच्याकडे 2771 धावा आहेत. त्याने 39 कसोटी सामन्यांमध्ये 71 डावांमध्ये 42.63 च्या सरासरीने ही कामगिरी केली.
खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजी प्रभावी
दरम्यान, वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना दिवसभर कठोर परिश्रम करावे लागले. डावखुरा फिरकी गोलंदाज वारिकन हा त्यांच्यासाठी सर्वात यशस्वी बॉलिंग करणारा ठरला, त्याने तीन विकेट्स घेतल्या. सध्याच्या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजी फारशी प्रभावी ठरत नसल्याचे दिसून येत आहे.