TRENDING:

IND vs WI Test : शेवटची संधी! पुढच्या 100 वर्षात भारत - वेस्ट इंडिज टेस्ट मॅच होणार नाही, काय कारण?

Last Updated:

India vs West Indies Test Series : भारत आणि वेस्ट इंडिज (West Indies) हे देश पुढील 100 वर्षे एकमेकांविरुद्ध टेस्ट क्रिकेट खेळू शकणार नाहीत, अशी परिस्थिती लवकरच निर्माण होऊ शकते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
India vs West Indies Test : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 2 मॅचच्या टेस्ट मालिकेतील पहिली मॅच अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium, Ahmedabad) सुरू आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडियाने दमदार सुरूवात केली असून वेस्ट इंडिज सध्या बॅकफूटवर आहे. अशातच आता अनेकांनी या टेस्ट मालिकेत रस दाखवला आहे. कारण पुढची 100 वर्ष भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात कसोटी मालिका होणार नाही, अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्याचं कारण काय? जाणून घ्या
India vs West Indies Test match may not play for Next 100 years
India vs West Indies Test match may not play for Next 100 years
advertisement

टेस्ट क्रिकेटमध्ये 'टू-टायर' पद्धत 

भारत आणि वेस्ट इंडिज (West Indies) हे देश पुढील 100 वर्षे एकमेकांविरुद्ध टेस्ट क्रिकेट खेळू शकणार नाहीत, अशी परिस्थिती लवकरच निर्माण होऊ शकते. याचं कारण म्हणजे टेस्ट क्रिकेटमध्ये 'टू-टायर' (Two-Tier) पद्धत येण्याची जोरदार चर्चा आहे. आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलनंतर ही पद्धत अवलंबली जाऊ शकते. जर ही पद्धत स्वीकारली गेली, तर टेस्ट खेळणाऱ्या देशांची दोन गटांमध्ये (Tiers) विभागणी होईल. यामध्ये जगातील अव्वल 5 किंवा 6 टीम्सचा एक गट तयार होईल, तर उर्वरित 6 टीम्स दुसऱ्या गटात असतील. या नियमानुसार, वेस्ट इंडिजचा संघ दुसऱ्या गटात बांग्लादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांसारख्या टीम्सविरुद्ध खेळेल.

advertisement

टीम इंडिया नेहमी वरचढ

जगातील अव्वल 5 संघात भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि इंग्लंड या संघांचा समावेश आहे. तर आयसीसीच्या रँकिंगमध्ये इतर संघ खालील क्रमांकावर आहेत. तसेच भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील मालिकेत नेहमी टीम इंडियाने बाजी मारली आहे. भारत-वेस्ट इंडिज यांच्यातला 100 कसोटी सामन्यांत भारताला 23 कसोटी जिंकता आल्या, तर विंडीजने 30 सामने जिंकले होते. 47 सामने ड्रॉ राहिले आहेत. मात्र, गेल्या 20 वर्षाचा इतिहास पाहता टीम इंडिया नेहमी वरचढ ढरली आहे.

advertisement

पहिल्या दिवसाचा खेळ कसा झाला?

टॉस जिंकून वेस्ट इंडिजचा कर्णधार रोस्टन चेसने (Roston Chase) प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला, पण भारतीय बॉलर्सनी हा निर्णय चुकीचा ठरवला. मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) भेदक बॉलिंग करत 4 विकेट्स घेतल्या. त्याला जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) उत्तम साथ दिली, ज्याने 3 विकेट्स घेतल्या. फिरकी बॉलर्सपैकी कुलदीप यादवने 2 विकेट्स आणि वॉशिंग्टन सुंदरने (Washington Sundar) 1 विकेट घेतली. अशाप्रकारे वेस्ट इंडिजचा डाव 162 धावांवर गडगडला.

advertisement

वेस्ट इंडिजकडून सर्वाधिक रन जस्टिन ग्रीव्ह्सने (Justin Greaves) 32 रन केले. रोस्टन चेसने 24 रन आणि शाई होपने (Shai Hope) 26 रन चे योगदान दिलं. वेस्ट इंडिजचा डाव लवकर संपल्यानंतर भारताने आत्मविश्वासाने सुरुवात केली. यशस्वी जयस्वाल मोठी इनिंग खेळू न शकल्याने केएल राहुल (KL Rahul) एक बाजू सांभाळून उभा राहिला आणि त्याने शानदार 53 रन (नॉट आऊट) करत आपले अर्धशतक पूर्ण केलं.

advertisement

दरम्यान, यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) आणि राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी 68 रनची भागीदारी केली. जयस्वाल 36 रन करून आऊट झाला, तर साई सुदर्शन (Sai Sudharsan) केवळ 7 रन करून माघारी परतला. दिवसाचा खेळ संपला तेव्हा कर्णधार शुभमन गिल (Shubman Gill) 18 रन (नॉट आऊट) सह केएल राहुल क्रीझवर होता.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs WI Test : शेवटची संधी! पुढच्या 100 वर्षात भारत - वेस्ट इंडिज टेस्ट मॅच होणार नाही, काय कारण?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल