अब्दुल समदचे वडील भावूक
अब्दुल समद खेळाच्या काही तास आधी जयपूरला पोहोचला होता. हे फार कमी लोकांना माहिती असेल कारण त्याच्या आईला पाठीच्या दुखापतीमुळे नवी दिल्लीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. समदचे वडील मोहम्मद फारूक यांनी संकटाच्या वेळी मानसिक खंबीरपणा दाखवल्याबद्दल आपल्या मुलाचे कौतुक केलं. मला माझ्या मुलाच्या कामगिरीचा खरोखर अभिमान आहे, असं मोहम्मद फारूक यांनी म्हटलं आहे.
advertisement
काही मिनिटआधी ड्रेसिंग रुममध्ये पोहोचला
माझ्या पत्नीची तब्येत ठीक नसल्याने, संघ व्यवस्थापनाकडून परवानगी मिळाल्यानंतर समद काही दिवस तिच्यासोबत होता. सामन्याच्या अगदी आधी तो जयपूरला गेला आणि चांगली खेळी केली. संदीप शर्मासारख्या अनुभवी गोलंदाजाविरुद्ध चार षटकार मारणे सोपं काम नाही. मला आशा आहे की समद उर्वरित सामन्यांमध्ये अशाच खेळी करत राहील, असं अब्दुल समदचे वडील मोहम्मद फारूक यांनी म्हटलं आहे.
कोण आहे अब्दुल समद?
आयपीएल 18 मध्ये बहुतेकांच्या नजरा स्फोटक फलंदाज अब्दुल समदवर असतील. 2020 मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून आयपीएल कारकिर्दीला सुरुवात करणारा रसिक यावेळी लखनौ सुपर जायंट्सकडून खेळताना दिसतोय. मुळचा जम्मू काश्मीरचा असलेला अब्दुल समद त्याच्या आक्रमक खेळीसाठी चर्चेत असतो. समदने आतापर्यंत 50 आयपीएल सामन्यांमध्ये 577 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याचा स्ट्राईक रेट 146 आहे. समद जलद धावा काढण्यासाठी आणि स्फोटक फलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो.