TRENDING:

Ajinkya Rahane : रहाणेची सगळ्यात मोठी चूक, रघुवंशीने विनवण्या केल्या तरी ऐकलं नाही, KKR ने पायावर धोंडा मारला

Last Updated:

आयपीएल 2025 मधला सगळ्यात रोमांचक सामना पंजाब आणि केकेआरमध्ये पाहायला मिळाला. पंजाबने दिलेलं 112 रनचं आव्हानही कोलकात्याला पार करता आलं नाही.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आयपीएल 2025 मधला सगळ्यात रोमांचक सामना पंजाब आणि केकेआरमध्ये पाहायला मिळाला. पंजाबने दिलेलं 112 रनचं आव्हानही कोलकात्याला पार करता आलं नाही. 15.1 ओव्हरमध्येच केकेआरचा 95 रनवर ऑलआऊट झाला, त्यामुळे पंजाबने हा सामना 16 रननी जिंकला. पंजाबकडून युझवेंद्र चहलने 4 विकेट घेतल्या तर मार्को यानसनला 3 विकेट मिळाल्या. याशिवाय बार्टलेट, अर्शदीप सिंग आणि ग्लेन मॅक्सवेल यांना 1-1 विकेट घेण्यात यश आलं.
रहाणेची सगळ्यात मोठी चूक, रघुवंशीने विनवण्या केल्या तरी ऐकलं नाही, KKR ने पायावर धोंडा मारला
रहाणेची सगळ्यात मोठी चूक, रघुवंशीने विनवण्या केल्या तरी ऐकलं नाही, KKR ने पायावर धोंडा मारला
advertisement

कोलकात्याकडून अंगरिक्ष रघुवंशीने 28 बॉलमध्ये 37 रनची खेळी केली. तर आंद्रे रसेल आणि अजिंक्य रहाणेने प्रत्येकी 17-17 रन केले, पण या सामन्यात केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेने केलेली एक चूक केकेआरच्या पराभवाचं प्रमुख कारण ठरली.

अजिंक्य रहाणेची मोठी चूक

पंजाबने दिलेल्या 112 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरची सुरूवात खराब झाली. 7 रनवरच केकेआरचे ओपनर पॅव्हेलियनमध्ये परतले, यानंतर अजिंक्य रहाणे आणि अंगरिक्ष रघुवंशी यांनी डाव सावरायला सुरूवात केली, पण चहलच्या बॉलिंगवर अंपायरने अजिंक्य रहाणेला एलबीडब्ल्यू आऊट दिलं. अंपायरने आऊट दिल्यानंतर रहाणे अंगरिक्ष रघुवंशीजवळ आला आणि डीआरएस घ्यायचा का नाही? हे विचारायला लागला.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Ajinkya Rahane : रहाणेची सगळ्यात मोठी चूक, रघुवंशीने विनवण्या केल्या तरी ऐकलं नाही, KKR ने पायावर धोंडा मारला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल