यंदाचा लिलाव कुठं?
मागील दोन लिलाव परदेशात आयोजित करण्यात आले होते. 2023 मध्ये दुबईत आणि 2024 मध्ये सौदी अरेबियातील जेद्दाह येथे लिलाव पार पडला होता. मात्र, यावेळेस लिलाव परदेशात घेण्याबद्दल कोणतीही चर्चा नाही. फ्रँचायझींच्या सूत्रांनुसार, बीसीसीआय या मिनी-लिलावाचे आयोजन भारतातच करेल. मात्र, याबाबतही अधिकृत निर्णय होणं बाकी आहे.
advertisement
रिटेन्शन लिस्ट जाहीर करावी लागणार?
आयपीएलच्या मिनी लिलावासाठी प्रत्येक फ्रँचायझीला रिटेन्शन लिस्ट जाहीर करावी लागणार आहे. त्यासाठी देखील बीसीसीआयने तारीख जाहीर केली आहे. प्रत्येक फ्रँचायझीला 15 नोब्हेंबरपर्यंत खेळाडूंची नावं जाहीर करावी लागणार आहे. यंदाचा लिलाव मिनी लिलाव असल्याने मोठे खेळाडू लिलावात नसतील.
चेन्नई सुपर किंग्जचे रिलीज खेळाडू कोण?
दरम्यान, रिलीज लिस्टमध्ये असलेल्या खेळाडूंमध्ये चेन्नई सुपर किंग्ज (CSK) चे दीपक हुडा, विजय शंकर, राहुल त्रिपाठी, सॅम करन आणि अगदी डेव्हॉन कॉनवे यांचा समावेश आहे, अशी माहिती क्रिकबझच्या रिपोर्टनुसार समोर आली आहे. डिसेंबरमध्ये होणाऱ्या मिनी-लिलावात आरसीबी आपला संघ आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न करेल. ते विराट कोहली, रजत पाटीदार, जोश हेझलवूड, जितेश शर्मा आणि भुवनेश्वर कुमार सारख्या अनुभवी खेळाडूंना कायम ठेवू शकतात.