TRENDING:

Mumbai Indians : 2 खेळाडू ट्रेड, 7 जणांना डच्चू... IPL लिलावाआधीच मुंबई इंडियन्समध्ये मोठे उलटफेर!

Last Updated:

आयपीएल 2026 साठी सगळ्या 10 टीमनी त्यांच्या तयारीला सुरूवात केली आहे, पण मुंबई इंडियन्सने या सगळ्यात आघाडी घेतली आहे. मुंबईने आतापर्यंत 2 खेळाडू ट्रेडमध्ये विकत घेतले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आयपीएल 2026 साठी सगळ्या 10 टीमनी त्यांच्या तयारीला सुरूवात केली आहे, पण मुंबई इंडियन्सने या सगळ्यात आघाडी घेतली आहे. 15 नोव्हेंबरला सर्व टीमना त्यांनी रिलीज आणि रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करावी लागणार आहे, पण त्याआधीच मुंबईने दोन खेळाडू ट्रेड केले आहेत. मुंबईने लखनऊकडून शार्दुल ठाकूरला 2 कोटी रुपयांना तर गुजरातकडून शरफेन रदरफोर्डला 2.6 कोटी रुपयांना टीममध्ये घेतलं आहे. तर दुसरीकडे मुंबईने अर्जुन तेंडुलकरला लखनऊला दिलं आहे. अर्जुनला मुंबईने लिलावात 30 लाख रुपयांमध्ये विकत घेतलं होतं.
2 खेळाडू ट्रेड, 7 जणांना डच्चू... IPL लिलावाआधीच मुंबई इंडियन्समध्ये मोठे उलटफेर!
2 खेळाडू ट्रेड, 7 जणांना डच्चू... IPL लिलावाआधीच मुंबई इंडियन्समध्ये मोठे उलटफेर!
advertisement

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबईचा मागच्या मोसमात क्वालिफायर-2 मध्ये पराभव झाला होता. सर्वाधिक 5 वेळा आयपीएल चॅम्पियन असलेल्या मुंबईला 2020 नंतर एकही ट्रॉफी जिंकता आलेली नाही. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह एवढे स्टार खेळाडू असूनही मुंबई इंडियन्सना मागच्या काही मोसमात संघर्ष करावा लागला आहे, त्यामुळे या मोसमाआधी मुंबई टीममध्ये मोठे बदल करण्याची शक्यता आहे.

advertisement

आयपीएल 2026 चा लिलाव डिसेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. याआधी 15 नोव्हेंबरला सर्व टीमना त्यांनी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करावी लागणार आहे. शनिवारी संध्याकाळी 5 वाजता सर्व 10 टीमनी रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जियो हॉटस्टार आणि स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह दाखवली जाणार आहे.

मुंबई किती खेळाडू रिटेन करणार?

advertisement

आयपीएल 2026 साठी मुंबई कर्णधार हार्दिक पांड्या, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव यांच्यासह 15 खेळाडूंना रिटेन करण्याची शक्यता आहे. यामध्ये 5 परदेशी आणि 10 भारतीय खेळाडू असू शकतात. मुंबई टीममधले महत्त्वाचे खेळाडू बदलणार नाही, तर बॅकअप म्हणून घेतलेल्या 7 खेळाडूंना डच्चू मिळू शकतो.

मुंबईची संभाव्य रिटेनशन लिस्ट

हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, तिलक वर्मा, ट्रेन्ट बोल्ट, विघ्नेश पुथ्थुर, कर्ण शर्मा, मिचेल सॅन्टनर, विल जॅक्स, रॉबिन मिन्झ, नमन धीर, अल्लाह गझनफर, अश्विनी कुमार, रेयान रिकलटन

advertisement

मुंबईची संभाव्य रिलीज लिस्ट

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
डायबिटीज रिव्हर्सल म्हणजे काय? शरीराला कसा होतो फायदा? Video
सर्व पहा

बेवॉन जेकब्स, श्रीजित कृष्णन, राज अंगद बावा, दीपक चहर, रीस टॉपली, सत्यनारायण राजू, लिझार्ड विलियम्स

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Mumbai Indians : 2 खेळाडू ट्रेड, 7 जणांना डच्चू... IPL लिलावाआधीच मुंबई इंडियन्समध्ये मोठे उलटफेर!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल