TRENDING:

IPL 2026 Retention : मुंबई इंडियन्स 2 स्टार खेळाडूंना दाखवणार बाहेरचा रस्ता? रिटेन्शनआधी आली मोठी अपडेट

Last Updated:

मुंबई इंडियन्समधून मोठी अपडेट समोर आली आहे. त्यानुसार मुंबई दोन खेळाडूंना रिलीज करण्याची शक्यता आहे. हे खेळाडू कोण असणार आहेत? हे जाणून घेऊयात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Mumbai Indian Retention : आयपीएल 2026 साठी ट्रेड सूरू आहे.तर आयपीएलमधील सर्व संघांना येत्या 15 नोव्हेंबर 2025 ला रिटेन्शन यादी जाहीर करायची आहे. या रिटेन्शन यादी आधी मुंबई इंडियन्समधून मोठी अपडेट समोर आली आहे. त्यानुसार मुंबई दोन खेळाडूंना रिलीज करण्याची शक्यता आहे. हे खेळाडू कोण असणार आहेत? हे जाणून घेऊयात.
ipl 2026 mumbai indian
ipl 2026 mumbai indian
advertisement

खरं तर मुंबई इंडियन्सने अद्याप त्यांची रिटेन्शन यादी जाहीर केली नाही आहे.पण त्याआधी ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू मॅथ्यू हेडनने मुंबई इंडियन्सवर मोठी भविष्यवाणी केली आहे. मुंबई इंडियन्स आपल्या संघातून वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टला रिलीज करू शकते. यासोबत मुंबई इंडियन्स दीपक चाहला देखील रिलीज करण्याची शक्यता आहे. दरम्यान या मुंबई या खेळाडूंना का रिलीज करणार आहे? याची कारणे देखील समोर आली आहेत.

advertisement

"मुंबई इंडियन्सकडे संतुलित प्लेइंग इलेव्हन आहे, परंतु त्यांना अजूनही काही कठीण निर्णय घ्यावे लागतील, ज्यामध्ये ट्रेंट बोल्टला रिलीज करण्याचा समावेश होतो,असे मॅथ्यू हेडनने जिओहॉटस्टार आयपीएल 2026 रिटेन्शन प्रिव्ह्यूमध्ये म्हटले आहे.ट्रेंट बोल्टला गेल्या हंगामात मुंबईने 12.50 कोटी (अंदाजे $1.25 अब्ज) मध्ये विकत घेतले होते आणि त्याने एकूण 22 विकेट्स घेतल्या होत्या. बोल्ट त्याच्या धारदार गोलंदाजीने उत्कृष्ट कामगिरी करतो.पॉवरप्लेमध्ये तो उत्तम गोलंदाजी करतो. त्यामुळे, त्याला सोडणे हा एक खूप कठीण निर्णय असेल. पण जरी मुंबईला त्याला सोडत असली तरी मिनी-लिलावात मुंबई कमी किमतीत बोल्टला घेण्याचा प्रयत्न करू शकते.

advertisement

ट्रेट बोल्ट सोबत मुंबई इंडियन्स दीपक चहरला देखील रिलीज करण्याची शक्यता आहे. दीपक चहरला सोडल्याने संघ मिनी-लिलावात कमी किमतीत चांगले वेगवान पर्याय शोधू शकेल, असा विश्वास मॅथ्यू हेडनला वाटतो.दीपक चहरला आयपीएल 2025 मध्ये मुंबईने 9.25 कोटी मध्ये विकत घेतले होते, परंतु तो संघासाठी प्रभावी ठरला नाही. दीपक चहरने या हंगामात मुंबईसाठी फक्त 11 बळी घेतले.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुण्यातील खरटमल कुटुंबाचा अनोखा छंद, जुन्या ग्रामोफोनचा केला संग्रह,काय आहे खास?
सर्व पहा

गेल्या हंगामात दीपक चहरची कामगिरी खराब होती आणि दुखापतींमुळे तो त्रस्त होता.परिणामी, मुंबईला मिनी-लिलावात बॅकअप म्हणून तरुण खेळाडूंना घेऊन त्यांची बेंच स्ट्रेंथ मजबूत करण्याची संधी आहे. दीपक चहरला सोडण्याचे कारण त्यांनी हेच दिले. मिनी-लिलावात बोल्ट आणि चहरला परत खरेदी करता येईल असेही हेडनने शेवटी सांगितले आहे.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 Retention : मुंबई इंडियन्स 2 स्टार खेळाडूंना दाखवणार बाहेरचा रस्ता? रिटेन्शनआधी आली मोठी अपडेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल