TRENDING:

Irani Cup : विदर्भाचा वाघ, 84 ओव्हर बॅटिंग करूनही नॉटआऊट, टीम इंडियाच्या बॉलरनीही गुडघे टेकले!

Last Updated:

रणजी ट्रॉफी विजेत्या विदर्भाने इराणी कप 2025 च्या पहिल्या दिवशी रेस्ट ऑफ इंडियाविरुद्ध शानदार बॅटिंग करत पाच विकेट गमावून 280 रन केल्या.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नागपूर : रणजी ट्रॉफी विजेत्या विदर्भाने इराणी कप 2025 च्या पहिल्या दिवशी रेस्ट ऑफ इंडियाविरुद्ध शानदार बॅटिंग करत पाच विकेट गमावून 280 रन केल्या. विदर्भाचा ओपनर अथर्व तायडेचे नाबाद शतक आणि यश राठोडच्या शानदार अर्धशतकामुळे विदर्भाला सुरुवातीच्या धक्क्यातून सावरण्यास मदत झाली, एवढंच नाही तर अर्थव आणि यशने विदर्भाला मजबूत स्थितीत आणले. नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या सामन्याचा पहिला दिवस अथर्व तायडेचा होता.
विदर्भाचा वाघ, 84 ओव्हर बॅटिंग करूनही नॉटआऊट, टीम इंडियाच्या बॉलरनीही गुडघे टेकले!
विदर्भाचा वाघ, 84 ओव्हर बॅटिंग करूनही नॉटआऊट, टीम इंडियाच्या बॉलरनीही गुडघे टेकले!
advertisement

अथर्व तायडेचं खणखणीत शतक

विदर्भाने पहिल्या सात ओव्हरमध्ये एकही विकेट न गमावता 40 रन करत स्थिर सुरूवात केली. पण, रेस्ट ऑफ इंडियाने त्यानंतर वेगवान आक्रमण सुरू केले ज्यामुळे विदर्भाने 80 रनमध्येच 3 विकेट गमावल्या होत्या. यानंतर अथर्व तायडे आणि यश राठोड यांनी चौथ्या विकेटसाठी 184 रनची पार्टनरशीप केली, ज्यामुळे विदर्भाला फक्त अडचणीतून बाहेर काढलं नाही, तर दिवसाच्या शेवटी त्यांना मजबूत स्थितीमध्येही आणलं.

advertisement

दरम्यान, अथर्व तायडेने 240 बॉलमध्ये 12 फोर आणि एका सिक्ससह नाबाद 118 रन केल्या. दिवसाच्या संपूर्ण 84 ओव्हर अथर्व तायडे मैदानात राहिला आणि त्याने विदर्भाचा डाव सावरला. आता दुसऱ्या दिवशी अर्थव तायडेचा आणखी मोठी खेळी करण्याचा प्रयत्न असेल. दरम्यान यश राठोडचं शतक मात्र फक्त 9 रननी हुकलं. यशने 153 बॉलमध्ये 91 रन केले. 74 व्या ओव्हरमध्ये मानव सुतारच्या बॉलिंगवर मोठा शॉट खेळण्याच्या नादात यश आऊट झाला.

advertisement

दुसरीकडे, रेस्ट ऑफ इंडियाचा फास्ट बॉलर आकाशदीपने आक्रमक सुरुवात केली. त्याने दुसऱ्या ओव्हरमध्येच तायडेला आऊट केलं, पण तो नो-बॉल ठरला. त्यानंतर आकाशदीपने आठव्या ओव्हरमध्ये अमन मोखाडेला विकेट कीपर इशान किशनकडून कॅच करून पहिली विकेट घेतली. पहिल्या दिवशी आकाश दीपने एकूण 2 विकेट्स घेतल्या, तर मानव सुतारने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Irani Cup : विदर्भाचा वाघ, 84 ओव्हर बॅटिंग करूनही नॉटआऊट, टीम इंडियाच्या बॉलरनीही गुडघे टेकले!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल