TRENDING:

रोहित शर्मामुळे IPL कॉमेंट्रीमधून हकालपट्टी? 5 महिन्यांनी इरफान पठाणने घडलेलं सगळं सांगितलं!

Last Updated:

भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाण मागच्या काही काळापासून कॉमेंट्रीमधलं एक मोठं नाव बनलं आहे, याच कारणामुळे जेव्हा आयपीएल 2025 मध्ये इरफानला कॉमेंट्रीमधून हटवण्यात आलं, तेव्हा मोठा वाद निर्माण झाला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाण मागच्या काही काळापासून कॉमेंट्रीमधलं एक मोठं नाव बनलं आहे, याच कारणामुळे जेव्हा आयपीएल 2025 मध्ये इरफानला कॉमेंट्रीमधून हटवण्यात आलं, तेव्हा मोठा वाद निर्माण झाला होता. इरफान पठाणने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात काही क्रिकेटपटूंवर टीका केल्यामुळे त्याला आयपीएल कॉमेंट्रीमधून बाहेर केल्याचंही बोललं गेलं. इरफान पठाणने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ज्या खेळाडूंवर टीका केली त्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचंही नाव होतं. आता इरफान पठाण याने या सगळ्या वादावर आणि कॉमेंट्रीमधून बाहेर करण्यावर भाष्य केलं आहे.
रोहित शर्मामुळे IPL कॉमेंट्रीमधून हकालपट्टी? 5 महिन्यांनी इरफान पठाणने घडलेलं सगळं सांगितलं!
रोहित शर्मामुळे IPL कॉमेंट्रीमधून हकालपट्टी? 5 महिन्यांनी इरफान पठाणने घडलेलं सगळं सांगितलं!
advertisement

लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीमध्ये इरफान पठाणने इरफान पठाणला कॉमेंट्री करताना टीका केल्यामुळे कॉमेंट्री पॅनलमधून हटवण्यात आलं का? असा प्रश्न विचारण्यात आला. ज्यावर इरफान पठाणने सविस्तर उत्तर दिलं.

काय म्हणाला इरफान पठाण?

'जे समोर दिसत आहे, त्यापेक्षा पुढची कहाणी सांगणं, हे कॉमेंटेटरचं काम आहे, असं मला वाटतं. जे सुरू आहे, ते का सुरू आहे? जे होत आहे, ते का होत आहे? तसंच जे होऊ शकतं, ते का होऊ शकतं?, हे सांगणं कॉमेंटेटरचं काम आहे. जर खेळाडू चांगली कामगिरी करत असेल, तर त्याचं कौतुक करणं आणि खराब करत असेल तर त्याच्यावर टीका करणं. कॉमेंटेटरची जबाबदारी खेळाडूंप्रती नाही तर फॅन्स प्रती आहे', असं इरफान पठाण म्हणाला.

advertisement

या मुलाखतीमध्ये इरफान पठाण रोहित शर्माबद्दलही स्पष्टपणे बोलला आहे. 'रोहित शर्मा व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये उत्कृष्ट खेळाडू आहे, पण टेस्ट क्रिकेटमध्ये त्याची सरासरी फक्त 6 ची होती. म्हणून रोहित कर्णधार नसता, तर टीममध्येही नसता, असं मी म्हणालो', असं वक्तव्य इरफान पठाणने केलं आहे.

'लोकांना वाटतं की मी रोहितला प्रमाणापेक्षा जास्त पाठिंबा देतो, पण मी प्रसारणकर्ता म्हणून स्वत:चं काम करतो. ब्रॉडकास्टिंग करताना जर एखाद्या खेळाडूची मुलाखत घ्यायची वेळ आली, तर साहजीकच तुम्ही त्या खेळाडूसोबत उद्धटपणे वागणार नाही. रोहित जेव्हा मुलाखत द्यायला आला, तेव्हा तो पाहुणा होता. मी त्याच्यासोबत ज्या प्रकारे बोललो, ते पाहून मी रोहितला प्रमाणापेक्षा जास्त सपोर्ट करतो, असं बोललं गेलं. पण रोहित टीममध्ये बसत नाही, हे बोलणाराही मीच होतो, पण याबद्दल कुणी बोललं नाही. मी रोहितची मुलाखत घेतली हेच जास्त बोललं गेलं', असं इरफान पठाण म्हणाला.

advertisement

ऑस्ट्रेलियामधल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीवेळी इरफानने रोहितची मुलाखत घेतली होती. ऑस्ट्रेलियामधल्या खराब कामगिरीनंतर जेव्हा रोहित शर्माने शेवटच्या टेस्टमधून हटण्याचा निर्णय घेतला, तेव्हा इरफान पठाणनेच त्याचा इंटरव्ह्यू घेतला होता.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
रोहित शर्मामुळे IPL कॉमेंट्रीमधून हकालपट्टी? 5 महिन्यांनी इरफान पठाणने घडलेलं सगळं सांगितलं!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल