मात्र इरफान पठाणने आता याबद्दल खुलासा केला आहे. त्याच्या मते विराट कोहली किंवा रोहित शर्मा नाही, तर भारतीय संघातील आणखी एक वरिष्ठ खेळाडू म्हणजेच हार्दिक पांड्या त्याच्या टीका टिप्पणीमुळे नाराज होता.
इरफान पठाणचा खुलासा
'द लल्लनटॉप'ला दिलेल्या मुलाखतीत इरफानने याबाबतचा खुलासा केला. समालोचक म्हणून त्याच्या भूमिकेनुसार हार्दिकबद्दल केलेली टीका फारशी कठोर नव्हती. जर मी 14 पैकी 7 सामन्यांमध्ये तुमच्यावर टीका करत असेल, तर मी अजूनही कठोर टीका केलेली नाही. समालोचक म्हणून हे आमचे काम आहे, असे त्याने मुलाखतीत सांगितले.
advertisement
इरफानने त्यांच्यात कोणतीही वैयक्तिक मतभेद किंवा स्पर्धा नसल्याचे म्हटले. तसेच त्याने बडोद्याच्या (Baroda) क्रिकेटपटूंना नेहमीच पाठिंबा दिल्याचे सांगितले. आमच्यात कोणतीही स्पर्धा नाही. दीपक हुडा, कृणाल पांड्या किंवा हार्दिक पांड्या- माझ्या नंतर जेवढे खेळाडू बडोद्यातून आले आहेत. त्यांच्यापैकी कोणीही असे म्हणू शकत नाही की इरफान-युसूफने त्यांना मदत केली नाही, असे इरफानने सांगितले.
हार्दिकला पाठिंबा
हार्दिकला यापूर्वी दिलेल्या पाठिंब्याचे उदाहरण देताना इरफानने 2012 मधील एक घटना आठवली. तेव्हा त्याने सनरायझर्स हैदराबाद संघाला (Sunrisers Hyderabad) तरुण हार्दिक पांड्याची शिफारस केली होती. इरफानच्या मते व्ही.व्ही.एस. लक्ष्मणने (VVS Laxman) नंतर कबूल केले होते की त्यावेळी इरफानचा सल्ला न ऐकल्याबद्दल त्याला पश्चात्ताप झाला होता.
व्ही.व्ही.एस. लक्ष्मणने स्टार स्पोर्ट्सवर मान्य केले की- 2012 मध्ये त्याने माझा सल्ला ऐकला नाही आणि हार्दिकला निवडले नाही, ही त्याची चूक होती. जर त्याने तेव्हा हार्दिकला निवडले असते, तर तो हैदराबादकडून खेळला असता, असे इरफानने सांगितले.
इरफानने पुढे हे देखील स्पष्ट केले की- सार्वजनिक टीकेच्या वेळीही त्याने हार्दिकचा बचाव केला होता. आयपीएल 2024 च्या आधी रोहित शर्माला कर्णधारपदावरून काढल्यानंतर हार्दिकला मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांकडून टीकेचा सामना करावा लागला होता. त्यावेळी मी त्यांची बाजू घेतली आणि सांगितले की खेळाडूबद्दल काहीही वाईट बोलू नका, असे म्हटले होते.
खेळाडूंच्या कारकिर्दीत टीका होणे ही एक नैसर्गिक गोष्ट आहे, असे इरफानने सांगितले. महान खेळाडू सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकर यांनाही टीकेचा सामना करावा लागल्याचे त्याने उदाहरण दिले, पण वैयक्तिक हल्ल्यांवर मात्र त्याने आक्षेप घेतला.
खेळाडूवर टीका करणे चुकीचे नाही, जर तुम्ही खेळत असाल तर तुम्हाला त्यातून जावे लागेल. हे सुनील गावस्कर आणि महान सचिन तेंडुलकर यांच्या बाबतीतही घडले आहे... त्यांनी कधीही कोणाला हे जाणवू दिले नाही की ते खेळापेक्षा मोठे आहेत. पण हार्दिक पांड्याबद्दल वापरल्या गेलेल्या अपमानास्पद शब्दांच्या मी विरोधात आहे, असे तो म्हणाला.