भारतीय क्रिकेटमध्ये पुन्हा विजय-कार्तिकसारखं कांड?
या अफवा सुरू झाल्यापासून सोशल मीडियावर दिनेश कार्तिक आणि मुरली विजय यांच्यातल्या वादळाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. भारताचा माजी क्रिकेटपटू मुरली विजय हा त्याच्या क्रिकेटपेक्षाही मैदानाबाहेरील गोष्टींमुळे चर्चेत राहिला. मुरली विजय हा त्याचा मित्र दिनेश कार्तिकच्या पत्नीच्याच प्रेमात पडला.
मुरली विजय हा अनेकवेळा दिनेश कार्तिकला भेटायला त्याच्या घरी जायचा, तेव्हाच त्याचे कार्तिकची पत्नी निकितासोबत बोलणं सुरू झालं, तिथून या दोघांच्या प्रेम कहाणीला सुरूवात झाली. दिनेश कार्तिक आणि निकिता बालपणापासूनचे मित्र होते. या दोघांनी 2007 मध्ये लग्न केलं, मात्र लग्नानंतर निकिताचं मुरली विजय सोबत अफेयर सुरू झालं.
advertisement
2012 साली दिनेश कार्तिक एका स्थानिक सामन्यात खेळत असताना त्याला पत्नीचं मुरली विजयसोबत अफेयर सुरू असल्याचं समजलं आणि त्याला धक्का बसला, यानंतर दिनेश कार्तिक आणि निकिताने घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर निकिता आणि मुरली विजय यांनी लग्न केलं. पुढे दिनेश कार्तिकने भारताची प्रसिद्ध स्क्वॅशपटू दीपिका पल्लीकलसोबत लग्न केले.