तिवारीने गंभीरची शाळा घेतली
गंभीरने पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान मॅचवर आपले मत व्यक्त केलं होतं. त्यावेळी त्याने दोन्ही देशांमध्ये मॅच होऊ नये, असं म्हटलं होतं. त्यावरून मनोज तिवारीने गंभीरची शाळा घेतली.
काय म्हणाला मनोज तिवारी?
मी नेहमीच गौतम गंभीरला ढोंगी मानत आलो आहे. तो ढोंगी आहे, कारण त्याने एकदा म्हटले होते की भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळू नये. आता तो त्याच टीमचा कोच आहे, जी पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. त्याने आपल्या पदाचा राजीनामा देऊन बीसीसीआयला सांगावं की तो पाकिस्तानविरुद्धच्या मॅचचा भाग होणार नाही, असं मनोज तिवारी म्हणाला आहे.
advertisement
गौतम गंभीर काय म्हणतो?
निर्णय सरकारचा असतो. मी आधीही सांगितलं आहे की भारतीय सैनिक आणि नागरिकांचे जीवन कोणत्याही क्रिकेट मॅचपेक्षा अधिक महत्त्वाचं आहे. मॅचेस होत राहतील, पण जवळच्या व्यक्तीला गमावणं ही खूप मोठी गोष्ट आहे. हा निर्णय माझ्या हातात नाही, तो बीसीसीआय आणि सरकार घेईल. आपण कोणताही राजकारण न करता त्यांचा निर्णय स्वीकारला पाहिजे, असं गौतम गंभीर म्हणाला होता.