'आम्ही घरी जात असताना श्रेयस अय्यर कुठे राहतो? याबद्दल बोलत होतो, तेव्हा अचानक असं झालं', असं या मुली म्हणाल्या. श्रेयस अय्यर दिसताच त्यांनी त्यांची गाडी रिटर्न फिरवली. श्रेयस अय्यर इतका क्युट दिसत होता, आमची मॉर्निंग एकदम क्रेझी झाली. त्याने आमच्यासाठी गाडी थांबवली, पण आम्ही ते रेकॉर्ड करायला विसरलो, एकदम क्रेझी त्याने आमच्यासाठी गाडी थांबवली, असं या तीन मुली म्हणाल्या आहेत. श्रेयस अय्यर मुंबईच्या रस्त्यावरून त्याची 3 कोटींची मर्सिडिज जी वॅगन घेऊन जात होता.
advertisement
श्रेयस अय्यरचं कमबॅक कधी?
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या वनडे सीरिजवेळी फिल्डिंग करताना श्रेयस अय्यरला गंभीर दुखापत झाली, त्यानंतर त्याला सिडनीमधल्या रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं. या दुखापतीतून श्रेयस अय्यर अजूनही सावरलेला नाही, त्यामुळे त्याची दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये निवड झाली नाही. तसंच न्यूझीलंडविरुद्ध पुढच्या महिन्यात होणाऱ्या वनडे सीरिजमध्येही अय्यरच्या खेळण्याची शक्यता कमी आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावेळीच श्रेयस अय्यरची भारतीय वनडे टीमच्या उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली होती.
न्यूझीलंडविरुद्धच्या सीरिजमध्येही अय्यर फिट झाला नाही, तर तो थेट आयपीएल 2026 मध्ये खेळताना दिसू शकतो. कारण तो भारताच्या टी-20 टीमचा भाग नाही, तसंच न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सीरिजनंतर टी-20 सीरिज होणार आहे, तसंच त्यानंतर फेब्रुवारी-मार्च दरम्यान टी-20 वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे, त्यामुळे श्रेयस अय्यर आता थेट आयपीएल 2026 मध्येच मैदानात दिसण्याची शक्यता आहे.
