काय म्हणाला मोहम्मद सिराज?
अहमदाबादच्या या ग्रीन-टॉप विकेटवर बॉलिंग करण्यासाठी मी खूप उत्सुक होतो, कारण अशी विकेट भारतात क्वचितच मिळते. यापूर्वी न्यूझीलंडविरुद्ध बेंगळुरूमध्ये अशीच विकेट मिळाली होती. मोहम्मद सिराज ब्रँडन किंगच्या विकेटचा सर्वांत चांगला बॉल तो होता, ज्यावर ब्रँडन किंगची मिडल स्टंप उडाला. त्यावर बोलताना सिराजने इनसाईड स्टोरी सांगितली. मी जसा प्लॅन केला होता, तसाच बॉल टाकू शकलो. यापूर्वीच्या दोन बॉलवर तो पॅड्सवर बॉल घेत होता, म्हणून मी स्टंपच्या रेषेत बॉलिंग करण्याचा विचार केला. मला जसा परिणाम हवा होता, अगदी तसाच तो झाला, असं मोहम्मद सिराज म्हणाला आहे.
advertisement
कोणीही पाचवी विकेट दिली नाही - सिराज
इंग्लंडमध्ये ती खूप स्पर्धात्मक सिरीज होती आणि त्यातून मला खूप आत्मविश्वास मिळाला. एका मजबूत टीमविरुद्ध परफॉर्म केल्याने वेगळा आत्मविश्वास मिळतो आणि तो मला आजही जाणवला. या फोर विकेट्ससाठीही मला खूप मेहनत करावी लागली. इंग्लंडमध्येही मला मेहनत करावी लागली होती. विकेट्स सहज मिळतात, असं नाही. मला आज कोणीही पाचवी विकेट दिली नाही, त्यामुळे या फोर विकेट्स घेण्यासाठी मला कठोर परिश्रम करावे लागले, असं मोहम्मद सिराज म्हणाला आहे. यावेळी त्याने कुणावरही खापर फोडलं नाही.
आत्मविश्वास या मॅचमध्येही कामी आला
दरम्यान, सुरुवातीला इंग्लंडमध्ये भारताने मिळवलेल्या 2-2 च्या टेस्ट सिरीज ड्रॉमुळे त्याला मिळालेला आत्मविश्वास या मॅचमध्येही कामी आला, असं देखील सिराजने म्हटलं आहे. त्यामुळे आता सिराज चालू असलेल्या दोन टेस्ट सिरीजमध्ये कशी कामगिरी करतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.