बीसीसीआयचा प्लान काय?
पीटीआयच्या वृत्तानुसार, बीसीसीआय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला मोहसीन नक्वी याला आयसीसी संचालकपदावरून काढून टाकण्याची विनंती करण्याची योजना आखत आहे. आशिया कप जिंकल्यानंतर भारतीय खेळाडूंनी नक्वीकडून ट्रॉफी स्वीकारायला नकार दिला, यानंतर नक्वी ट्रॉफी घेऊन निघून गेला. आशिया कपची ट्रॉफी सध्या एसीसीच्या दुबई मुख्यालयात बंद ठेवण्यात आली आहे.
भारताने आशिया कपच्या फायनलमध्ये पाकिस्तानला हरवून विजेतेपद पटकावले, पण भारतीय खेळाडूंनी मोहसिन नक्वीकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर नक्वी ट्रॉफी घेऊन निघून गेला, ज्यामुळे मोठा वाद सुरू झाला.
advertisement
बीसीसीआय आयसीसीकडे जाणार
पीटीआयच्या वृत्तानुसार, आशिया कपच्या फायनलनंतर एसीसी अध्यक्ष मोहसिन नक्वी याच्या कृतीचा मुद्दा बीसीसीआय आयसीसीकडे उपस्थित करण्याचा विचार करत आहे. बीसीसीआय नक्वीला आयसीसी संचालक पदावरून काढून टाकण्याचा प्रस्ताव देऊ शकते.
वृत्तानुसार, बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की मोहसिन नक्वी या प्रकरणात काय कारवाई करतात हे पाहणे बाकी आहे. मोहसिन नक्वी जे करत आहे ते पूर्णपणे चुकीचे आहे आणि बीसीसीआय त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करणार आहे. 30 सप्टेंबर रोजी एसीसीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (एजीएम) मोहसिन नक्वी याने स्पष्ट केले की, आपण बीसीसीआयला आशिया कप ट्रॉफी अशीच देणार नाहीत, तर वैयक्तिकरित्या ट्रॉफी सोपवली जाईल.