42 वेळा रणजी ट्रॉफी विजेता मुंबई त्यांच्या पहिल्या सामन्यात जम्मू आणि काश्मीरचा पराभव करून गेल्या हंगामातील पराभवाचा बदला घेण्याचा प्रयत्न करेल.
शार्दुल ठाकूर मुंबईचा कॅप्टन
शार्दुल ठाकूर जम्मू-काश्मीर विरुद्धच्या सामन्यात मुंबईचे नेतृत्व करेल. अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, सरफराज खान आणि मुशीर खान यांचाही टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. कार अपघातामुळे गेल्या हंगामातील बहुतेक सामने मुशीरला मुकावे लागले होते.
advertisement
आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा ओपनप आणि भारताच्या अंडर-19 टीमचे नेतृत्व करणारा आयुष म्हात्रे टीमची बॅटिंग मजबूत करेल. मुंबईच्या या टीममध्ये अनुभव आणि तरुणांचं मिश्रण आहे.
श्रेयस अय्यर बाहेर
मुंबईकडून स्थानिक क्रिकेट खेळणाऱ्या श्रेयस अय्यरने पाठीच्या दुखापतीमुळे रेड-बॉल क्रिकेटमधून ब्रेक घेतला आहे, त्यामुळे त्याला मुंबईच्या टीममधून वगळण्यात आले आहे. गेल्या हंगामात उपांत्य फेरीत खेळणाऱ्या सूर्यकुमार यादवलाही मुंबईच्या टीममध्ये स्थान मिळालेलं नाही.
मुंबईची टीम
शार्दुल ठाकूर (कर्णधार), आयुष म्हात्रे, आकाश आनंद, हार्दिक तामोरे, अजिंक्य रहाणे, सिद्धेश लाड, सरफराज खान, शिवम दुबे, शम्स मुलानी, तनुष कोटियन, तुषार देशपांडे, सिल्वेस्टर डिसूझा, मुशीर खान, इरफान उमैर, अखिल हेरवाडकर, रॉयस्टन डियाज