TRENDING:

क्रिकेट विश्व शॉक, दक्षिण आफ्रिकेचा नामिबियाविरुद्ध पराभव, शेवटच्या 6 बॉल 11 रनमध्ये कसा फिरला सामना?

Last Updated:

आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासामध्ये सगळ्यात मोठा धक्कादायक निकाल लागला आहे. नामिबियाने बलाढ्य अशा दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : दक्षिण आफ्रिका आणि नामबिया यांच्यातल्या क्रिकेट सामन्यात कोणती टीम विजयी होईल? हे विचारलं तर प्रत्येक क्रिकेट चाहता दक्षिण आफ्रिका हेच उत्तर देईल, पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासामध्ये सगळ्यात मोठा धक्कादायक निकाल लागला आहे. नामिबियाने बलाढ्य अशा दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आहे. शेवटच्या बॉलपर्यंत गेलेल्या या थरारक सामन्यात नामिबियाने दक्षिण आफ्रिकेवर रोमांचक विजय मिळवला आहे.
क्रिकेट विश्व शॉक, दक्षिण आफ्रिकेचा नामिबियाविरुद्ध पराभव, शेवटच्या 6 बॉल 11 रनमध्ये कसा फिरला सामना?
क्रिकेट विश्व शॉक, दक्षिण आफ्रिकेचा नामिबियाविरुद्ध पराभव, शेवटच्या 6 बॉल 11 रनमध्ये कसा फिरला सामना?
advertisement

शेवटच्या 3 ओव्हरमध्ये थरार

शेवटच्या 3 ओव्हरमध्ये नामिबियाला विजयासाठी 32 रनची गरज होती, तेव्हा त्यांनी 17 व्या ओव्हरमध्ये 9 रन काढले, त्यामुळे त्यांना शेवटच्या 2 ओव्हरमध्ये 23 रन हवे होते. यानंतर 19 व्या ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेचा फास्ट बॉलर लिझार्ड विलियम्सने 12 रन दिल्या, त्यामुळे नामिबियाला शेवटच्या ओव्हरमध्ये 11 रनचं आव्हान आलं. यानंतर शेवटच्या ओव्हरमध्ये झेन ग्रीनने साईमलेनवर आक्रमण करून 14 रन ठोकले आणि नामिबियाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.

advertisement

दक्षिण आफ्रिकेने दिलेलं 135 रनचं आव्हान नामिबियाने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून पार केलं. झेन ग्रीनने 23 बॉलमध्ये सर्वाधिक 30 रन केले. तर कर्णधार गेरहार्ड इरासमसने 21 रनची महत्त्वाची खेळी केली. दक्षिण आफ्रिकेकडून नांद्रे बर्गरला 2, ऍन्डिले साईमलेनला 2, कोटझीला 1 आणि फोर्टुईनला 1 विकेट मिळाली.

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, यानंतर त्यांनी 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून फक्त 138 रन केले. जे स्मिथने 30 बॉलमध्ये सर्वाधिक 31 रन केले, याशिवाय रुबिन हेरमॅनने 23 आणि लुहान ड्रे प्रिटोरियसने 22 रनची खेळी केली. नामबियाकडून ट्रम्पलमनला 3 विकेट मिळाल्या. याशिवाय हेइंगोला 2, एरासमसला 1, शिकोंगोला 1 आणि स्मिटला 1 विकेट मिळाली.

advertisement

नामिबियाने इतिहास घडवला

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर दबावातच, आजही भाव वाढ नाहीच, कारण काय?
सर्व पहा

दक्षिण आफ्रिका आणि नामबिया यांच्यामध्ये 1 टी-20 मॅचची ही सीरिज खेळवली गेली, त्यामुळे या सीरिजमध्येही नामबियाचा विजय झाला आहे. सोबतच दक्षिण आफ्रिकेचा टी-20 क्रिकेटच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच असोसिएट देशाविरुद्ध पराभव झाला आहे. दुसरीकडे नामबियाने आयसीसीच्या फुल मेंबर देशाचा पराभव करण्याची ही चौथी वेळ आहे. याआधी नामिबियाने आयर्लंड, श्रीलंका आणि झिम्बाब्वेला टी-20 सामन्यात पराभूत केलं आहे.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
क्रिकेट विश्व शॉक, दक्षिण आफ्रिकेचा नामिबियाविरुद्ध पराभव, शेवटच्या 6 बॉल 11 रनमध्ये कसा फिरला सामना?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल