नितीश कुमारने ज्या परिस्थितीत शतकी खेळी केली त्याचे कौतुक सर्वजण करत आहेत. त्याच्या या खेळीवर भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी मोठे वक्तव्य केले आहे. गावस्करांच्या वक्तव्यावर फक्त भारतीय नाही तर जागतिक क्रिकेटमधील सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.
प्राजक्ता माळीने थेट देवेंद्र फडणवीस फोन केला
दिवसाचा खेळ संपल्यानंतर सुनील गावस्कर म्हणाले, हे त्याचे पहिले शतक आहे आणि नजीकच्या भविष्यात तो अनेक शतकं करेल. मला आशा आहे की भविष्यात तो अशाच धावा करताना दिसेल. स्टार स्पोर्ट्सवर बोलताना गावस्कर पुढे म्हणाले- तो भारतीय क्रिकेटचा नवा स्टार आहे. जर तो स्वत:शी प्रामाणीक राहिला तर भारताच्या या २१ वर्षीय ऑलराउंडरचे भविष्य उज्जवल आहे. नितीश भारतीय क्रिकेटमुळे इथे आहे आणि त्याने भारतीय क्रिकेटला हलक्यात घेऊ नये.
advertisement
नितीश कुमार-वॉशिंग्टन सुंदर यांच्या नावावर झाला अनोखा विक्रम
नितीश कुमार रेड्डीचे हे शतक भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महान शतकांपैकी एक असावे, असे गावस्कर म्हणाले.
https://x.com/mufaddal_vohra/status/1872896492140446061
शनिवारी ऋषभ पंत आणि रविंद्र जडेजा हे अनुभवी फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर संघावर फॉलोऑनचा धोका होता. कुमारने यशस्वीपणे ऑस्ट्रेलियाला रोखले. उद्या चौथ्या दिवशी देखील नितीश कुमार चर्चे राहण्याची शक्यता आहे. भारत अद्याप ११६ धावांनी पिछाडीवर असून ही पिछाडी कमी करण्याचा त्याचा प्रयत्न असेल. कुमार सोबत असलेल्या मोहम्मद सिराजने मिळून ऑस्ट्रेलियाला रोखून धरले तर त्याचा फायदा भारताला चौथ्या डावात होऊ शकतो.
