IND vs AUS: कसोटी क्रिकेटच्या १४७ वर्षाच्या इतिहासात प्रथमच असे घडले; नितीश कुमार-वॉशिंग्टन सुंदरने केला अनोखा विक्रम

Last Updated:
News18
News18
मेलबर्न: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथी कसोटी मेलबर्न येथे सुरू आहे. मॅचच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने ९ बाद ३५८ धावा केल्या होत्या, टीम इंडिया अद्याप ११६ धावांनी पिछाडीवर आहे. शतकवीर नितीश कुमार रेड्डी १०५ धावांवर नाबाद असून त्याच्या सोबत मोहम्मद सिराज आहे.
मेलबर्न कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने ५ विकेट गमावल्या होत्या. टीम इंडियावर फॉलोऑनचे संकट होते. तिसऱ्या दिवशी भारताने ऋषभ पंत आणि रविंद्र जडेजा याची विकेट गमावली तेव्हा संघाने २२१ धावा केल्या होत्या. अशात नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी ऐतिहासिक भागिदारी करून ऑस्ट्रेलियाला फक्त धक्का दिला नाही तर भारताला मॅचमध्ये परत आणले.
advertisement
नितीश कुमार आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी आठव्या विकेटसाठी १२७ धावांची भागिदारी केली. या दोघांच्या भागिदारीत कसोटी क्रिकेटच्या १४७ वर्षाच्या इतिहासात आजवर कधीही न झालेल्या विक्रमांची नोंद झाली. कसोटी क्रिकेटमध्ये आजवर कधीच आठव्या आणि नवव्या क्रमांकावरील फलंदाजाने १५० हून अधिक चेंडू खेळले नाहीत. हा अनोखा विक्रम कुमार आणि सुंदर यांच्या नावावर झाला आहे. सुंदरने १६२ चेंडूत ५० धावा केल्या. तर कुमार १७६ चेंडूत १०५ धावांवर खेळत आहे.
advertisement
ऑस्ट्रेलियात ८व्या क्रमांकावर फलंदाजी करताना शतक करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. याआधी हा विक्रम अनिल कुंबळेच्या नावावर होता. इतक नाही तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वात कमी वयात शतक करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत कुमार तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज ठरला आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs AUS: कसोटी क्रिकेटच्या १४७ वर्षाच्या इतिहासात प्रथमच असे घडले; नितीश कुमार-वॉशिंग्टन सुंदरने केला अनोखा विक्रम
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement