152.65 किमी प्रतितास वेगाने बॉलिंग
पाकिस्तानला हा बॉलर दुसरा तिसरा कुणी नसून एहसानुल्लाह आहे. अभिषेक शर्माला पाकिस्तानी वेगवान गोलंदाज एहसानुल्लाहकडून खुलं आव्हान मिळालं आहे. हा तोच वेगवान गोलंदाज आहे, ज्याने 2023 च्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये 152.65 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी केली होती. जर मला भारताविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली तर मी अभिषेक शर्माला 3 ते 6 बॉलमध्ये बाद करेन, असं एहसानुल्लाहने म्हटलं आहे.
advertisement
अभिषेकला माझा बॉल समजणार नाही कारण...
जर मी अभिषेक शर्माला 140 स्पीडने गोलंदाजी केली तर ते 160 स्पीडसारखं वाटेल. तो माझा बॉल समजणार नाही कारण डावखुऱ्या फलंदाजाला माझा बॉल आत येतो. माझा बॉल बाहेर जात नाही. तो आतल्या बॉलवर कॅच घेतो. डावखुरा फलंदाज कोणत्याही दिशेनं येतो तरी मी त्याच्या उजव्या खांद्यावर बाउन्सर टाकतो. माझा बाउन्सर किती धोकादायक आहे हे तुम्हाला माहिती आहे, असं म्हणत एहसानुल्लाहने स्वत:चच गुनगाण गायलं आहे.
आयसीसीच्या क्रमवारीत नंबर 1 चा फलंदाज
एहसानुल्लाहने पाकिस्तानसाठी एक वनडे आणि चार टी-२० सामने खेळले आहेत आणि टी-२० सामने सहा विकेट्स घेतल्या आहेत. 2023 च्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये दुखापतीमुळे एहसानुल्लाह बाहेर पडण्यापूर्वी त्याने चार टी-२० सामने आणि एक वनडे सामने देखील खेळले होते. तुम्हाला माहिती नसेल तर अभिषेक शर्मा सध्या आयसीसीच्या क्रमवारीत नंबर 1 चा फलंदाज आहे.
