मुशीरचा पृथ्वीला डिवचण्याचा प्रयत्न
मुंबई विरुद्ध महाराष्ट्र या सामन्यात पृथ्वी शॉ याने महाराष्ट्रासाठी खेळताना केवळ 220 बॉलमध्ये आक्रमक 181 धावांची खेळी केली. त्यानंतर 74 व्या ओव्हरमध्ये मुंबईचा स्टार ऑलराऊंडर मुशीर खानच्या गोलंदाजीवर तो डीप फाइन लेगवर कॅच आऊट झाला. यानंतर शॉ पॅव्हेलियनकडे परतताना मुशीरने पृथ्वीला डिवचण्याचा प्रयत्न केला.
advertisement
'थॅंक यू' म्हणत स्लेजिंग
दोन्ही मित्रच असल्याने मुशीरने त्याला 'थॅंक यू' म्हणत स्लेजिंग केली. मुशीरने डिवचल्यावर पृथ्वी शॉ चिडला आणि थेट मुशीरकडे गेला. पृथ्वीने त्याची कॉलर पकडण्याचा प्रयत्न केला आणि हातातील बॅट त्याच्या दिशेने फिरवली. मात्र, अंपायर आणि इतर खेळाडूंनी तातडीने मध्यस्थी करत परिस्थिती शांत केल्याचं पहायला मिळालं.
कोणतीही अधिकृत तक्रार नाही
मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील हा एक सराव सामना आहे. सगळे एकमेकांचे माजी सहकारी आहेत. अशा गोष्टी घडतात. आता सगळं ठीक आहे, असं महाराष्ट्राचा कर्णधार अंकित बावणे याने म्हटलं आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन किंवा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांनी या घटनेनंतर कोणतीही अधिकृत तक्रार किंवा कारवाई नोंदवलेली नाही. सराव सामना असल्याने पृथ्वीवर कोणतीही कारवाई होण्याची शक्यता नाही.
पृथ्वी शॉ आणि वाद
आयपीएलमध्ये विरोधी खेळाडूंशी वाद घालणं असो किंवा आता घरगुती सामन्यात त्याच्या तरुण सहकाऱ्यांशी भांडण्याचा प्रयत्न असो, पृथ्वी शॉ नेहमी अडचणीत सापडलाय. पृथ्वी शॉला त्याच्या वाढत्या वजन आणि खराब तंदुरुस्तीमुळे सातत्याने टीकेचा सामना करावा लागला आहे. हे व्यावसायिक क्रिकेटबद्दलच्या त्याच्या वचनबद्धतेचा अभाव दर्शवते. शिवाय, तो मैदानाबाहेरही वाद आणि संघर्षात अडकला आहे. या सर्व गोष्टींमुळे पृथ्वीच्या 181 धावांची विसर पडू नये म्हणजे झालं!