TRENDING:

वैभव सुर्यवंशी-आयुष्य म्हात्रे राहिले बाजूला, भारताच्या दिग्गज खेळाडूच्या मुलाची अंडर 19 संघात निवड

Last Updated:

भारताच्या या संघात वैभव सूर्यवंशी आणि आयुष्य म्हात्रे या दोन्ही खेळाडूंच नाव नाही आहे. पण भारताच्या दिग्गज खेळाडूच्या मुलाची निवड झाली आहे. हा दिग्गज खेळाडू कोण आहे?

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Anvay Dravid : बीसीसीआयने 19 वर्षाखालील तिरंगी मालिकेसाठी आज भारत अ आणि भारत ब संघाची घोषणा केली आहे. बंगळूरूमध्ये रंगणाऱ्या या तिरंगी मालिकेत भारताच्या दोन संघासह अफगाणिस्तानच्या 19 वर्षाखालील संघाचा समावेश आहे. या मालिकेत भारताच्या या संघात वैभव सूर्यवंशी आणि आयुष्य म्हात्रे या दोन्ही खेळाडूंच नाव नाही आहे. पण भारताच्या दिग्गज खेळाडूच्या मुलाची निवड झाली आहे. हा दिग्गज खेळाडू कोण आहे? आणि त्याच्या मुलाची कोणत्या संघात निवड झाली आहे? हे जाणून घेऊयात.
rahul dravid son anvay dravid
rahul dravid son anvay dravid
advertisement

भारताचा प्रतिभावान क्रिकेटपटू विहान मल्होत्राची मंगळवारी आगामी त्रिकोणी मालिकेसाठी भारताच्या १९ वर्षांखालील 'अ' संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर हैदराबादचा आरोन जॉर्ज भारताच्या १९ वर्षांखालील 'ब' संघाचे नेतृत्व करणार आहे.राहुल द्रविडचा मुलगा अन्वय द्रविड हा भारताच्या १९ वर्षांखालील 'ब' संघासोबत खेळणार आहे.

विहान मल्होत्राची कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली असली तरी त्याचे दोन सुपरस्टार सहकारी वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे इतर स्पर्धांमध्ये व्यस्त आहेत. आयुष म्हात्रे सध्या रणजी ट्रॉफीमध्ये खेळत आहे, तर वैभव सूर्यवंशीची एसीसी रायझिंग स्टार्स आशिया चषक स्पर्धेसाठी भारत ‘अ’ संघात निवड झाली आहे. हे तिन्ही युवा खेळाडू नुकत्याच झालेल्या भारतीय अंडर-19 ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा भाग होते. यष्टीरक्षक अभिज्ञान कुंडू तीन संघांच्या स्पर्धेत 'अ' संघाचा उपकर्णधार असेल, तर वेदांत त्रिवेदीला भारताच्या १९ वर्षांखालील 'ब' संघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

advertisement

१७ ते ३० नोव्हेंबर दरम्यान बेंगळुरू येथील भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सेंटर ऑफ एक्सलन्स येथे ही स्पर्धा खेळवली जाणार आहे.

भारतीय अंडर-19 अ संघ: विहान मल्होत्रा ​​(कर्णधार), अभिज्ञान कुंडू, वाफी कच्छी, वंश आचार्य, विनीत व्हीके, लक्ष्य रायचंदानी, ए. रापोल, कनिष्क चौहान, खिलन ए. पटेल, अनमोलजीत सिंग, मोहम्मद एनान, हेनिल पटेल, आशुतोष महिदा,आदित्य रावत आणि मोहम्मद मलिक

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुण्यातील खरटमल कुटुंबाचा अनोखा छंद, जुन्या ग्रामोफोनचा केला संग्रह,काय आहे खास?
सर्व पहा

अंडर-19 ब संघ: आरोन जॉर्ज (कर्णधार), वेदांत त्रिवेदी, युवराज गोहिल, मौल्यराज सिंग चावडा, राहुल कुमार, हरवंश सिंग, अन्वय द्रविड, आरएस अम्ब्रिस, बीके किशोर, नमन पुष्पक, हेमचुदेसन जे, उद्धव मोहन, इशान सूद,डी दीपेश दास, रोहित कुमार दास.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
वैभव सुर्यवंशी-आयुष्य म्हात्रे राहिले बाजूला, भारताच्या दिग्गज खेळाडूच्या मुलाची अंडर 19 संघात निवड
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल