टी-20 मध्ये सर्वाधिक विकेट
राशिद खानने 26 ऑक्टोबर 2015 साली बुलावायोमध्ये झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये पदार्पण केलं होतं. यानंतर राशिद खानने अफगाणिस्तानकडून 97 मॅच आणि आयसीसी वर्ल्ड इलेव्हनकडून वेस्ट इंडिजकडून एक मॅच खेळली. या सामन्यात त्याने 2 विकेट घेतल्या होत्या.
राशिदने आतापर्यंत 18 टीमविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी-20 मॅच खेळल्या आहेत, यात त्याच्या सर्वाधिक विकेट आयर्लंडविरुद्ध आहेत. आयर्लंडविरुद्ध राशिद खानने 21 सामन्यांमध्ये 45 विकेट मिळवल्या. अफगाणिस्तानकडून टी-20 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या बॉलरमध्ये राशिद खाननंतर मोहम्मद नबी आणि नवीन उल हक यांचा नंबर लागतो.
advertisement
याशिवाय जगभरातल्या क्रिकेट लीगमध्ये खेळणाऱ्या राशिद खान सर्वाधिक टी-20 विकेट घेणाऱ्या खेळाडूंमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. ड्वॅन ब्राव्हो (582 सामन्यांमध्ये 631 विकेट) आणि सुनिल नरेन (561 सामन्यांमध्ये 591 विकेट) यांच्यानंतर या यादीमध्ये राशिद खानचा क्रमांक आहे. राशिद खान आतापर्यंत 19 टी-20 टीमकडून खेळला आहे, ज्यात त्याने 489 मॅचमध्ये 664 विकेट घेतल्या आहेत.