मुंबईचा संघ गुजरात विरूद्धच्या सामन्याची तयारी करत आहे. ही तयारी सुरू असताना रोहित शर्माचा एक व्हिडिओ MIने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यात रोहित एक मोठा कॅमेरा घेऊन कोणाचा तरी फोटो काढतोय. त्याच वेळी कोणी तरी मोबाईलवर त्याचे शुटिंग घेत आहे. तेव्हा रोहित एका व्यक्तीला म्हणतोय की, अरे तुझाच वेट करतोय. तू पण जा तिकडे. डेडली ग्रुप आहे हा. आशिष नेहरा, सत्यजित परब, पार्थिव पटेल, विक्रम सोलंकी. डेडली आहे... जा ना तिकडे. जा तिकडे, मला एक फोटो काढायचा आहे. त्यावर संबंधित व्यक्ती त्याला म्हणते, आपण एक सेल्फी काढू. त्यावर रोहित त्याला म्हणतो, तू जा तरी तिकडे, मी येतो. हे सर्व रोहित मराठीत बोलतो.
advertisement
ATM मधून पैसे काढण्याआधी 10 वेळा विचार करा, ही चूक केल्यास Account होईल रिकामे
रोहित शर्माचा हा व्हिडिओ सर्व चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. रोहितला फार कमी वेळा अशा पद्धतीने मराठीत बोलताना पाहिले आहे.
व्हिडिओमध्ये पुढे रोहित मैदानात असलेल्या सत्यजित परब, पार्थिव पटेल, विक्रम सोलंकी यांना भेटतो. विक्रम सोलंकी रोहितला मुलगा झाल्याबद्दल शुभेच्छा देखील देताना व्हिडिओमध्ये दिसत आहे.
MIने शेअर केलेला हा व्हिडिओ खुप व्हायरल होत आहे. अनेकांनी रोहितच्या मराठीचे कौतुक देखील केले आहे. याआधी रोहितच्या नेतृत्वाखाली जेव्हा भारताने टी-२० वर्ल्डकप जिंकला होता तेव्हा महाराष्ट्र सरकारने विधानसभेच्या सभागृहात त्याचा सत्कार केला होता. तेव्हा रोहितने मराठीत भाषण केले होते.
भारतीय लष्करासाठी ऐतिहासिक दिवस: पाकिस्तान,चीन बसला झटका; मिळाले 'ब्रह्मास्त्र'
आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सला पाच वेळा विजेतपद मिळून देणाऱ्या रोहित शर्माने काही दिवसांपूर्वी देशाला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद मिळून दिले होते. आयपीएलच्या पहिल्या सामन्यात तो शून्यावर बाद झाला होता. आता दुसऱ्या लढतीत हिटमॅनची दमदार फलंदाजी पाहता येईल अशी चाहत्यांना आशा असेल.
