advertisement

ATM Transactions Free: ATM मधून पैसे काढण्याआधी 10 वेळा विचार करा, ही चूक केल्यास Account होईल रिकामे, RBIचा मोठा निर्णय

Last Updated:

ATM Transactions Free: RBI ने ATM व्यवहार शुल्कात वाढ जाहीर केली आहे. 1 मे 2025 पासून प्रति व्यवहार 23 शुल्क आकारले जाईल. ग्राहकांनी योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.

News18
News18
मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) शुक्रवारी एक मोठी आणि महत्त्वाची घोषणा केली. RBIने म्हटले आहे की, 1 मे 2025 पासून ATM व्यवहारांसाठी प्रति व्यवहार 23 शुल्क आकारले जाईल. यापूर्वी हे शुल्क 21 होते. ATM मधून रोख रक्कम काढणे महागणार आहे.
ATM मोफत व्यवहाराची मर्यादा
केंद्रीय बँकेने स्पष्ट केले आहे की, ग्राहकांना त्यांच्या बँकेच्या ATM मधून दरमहा 5 मोफत व्यवहार (आर्थिक आणि बिगर-आर्थिक दोन्ही) करण्याची परवानगी असेल.
-इतर बँकांच्या ATM मधून मेट्रो शहरांमध्ये 3 मोफत व्यवहार
-बिगर-मेट्रो शहरांमध्ये 5 मोफत व्यवहार करता येणार आहेत.
advertisement
ATM व्यवहार शुल्कात वाढ का?
इकॉनॉमिक टाईम्सच्या (ET) अहवालानुसार, RBI आणि नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) यांनी ATM इंटरचेंज फीमध्ये 2 वाढ करण्यास मान्यता दिली आहे.
-NPCI ने 13 मार्च रोजी सर्व सदस्य बँकांना या बदलाबाबत कळवले आहे.
-1 मे 2025 पासून ही नवीन फी लागू केली जाईल.
advertisement
ATM इंटरचेंज फी किती?
6 मार्च 2024 रोजी नॅशनल फायनान्शियल स्विच स्टीयरिंग कमिटीने ATM मधून पैसे काढण्यासाठी इंटरचेंज फी 19 वर नेण्यास मान्यता दिली. नॉन-फायनान्शियल व्यवहारांसाठी 7 शुल्क आकारले जाणार आहे.
GST स्वतंत्रपणे लागू होणार
ही सुधारित शुल्क रचना वस्तू आणि सेवा कर (GST) लागू केल्यानंतर अंतिम आकारामध्ये दिसेल.
advertisement
NPCI आणि RBI चा निर्णय
11 मार्च रोजी RBI ने NPCI ला कळवले होते की ATM नेटवर्कला इंटरचेंज फी ठरवण्याचा अधिकार आहे. NPCI ने ही सुधारित शुल्करचना सर्व बँकांना 13 मार्चला कळवली आणि 1 मे 2025 पासून अंमलबजावणी होईल, असे ET च्या अहवालात नमूद आहे.
ग्राहकांवर होणारा परिणाम
-मोफत व्यवहारांनंतर ग्राहकांना ATM व्यवहारांसाठी 23 शुल्क द्यावे लागेल.
advertisement
-नॉन-फायनान्शियल व्यवहारांसाठीही शुल्क लागू होईल.
-ग्राहकांनी ATM व्यवहारांची योग्य नियोजन करून अतिरिक्त शुल्क टाळावे.
1 मे 2025 पासून हा बदल लागू होणार असल्याने सर्वसामान्य ग्राहकांना आता आपल्या बँकिंग सवयी बदलाव्या लागणार आहेत.
view comments
मराठी बातम्या/मनी/
ATM Transactions Free: ATM मधून पैसे काढण्याआधी 10 वेळा विचार करा, ही चूक केल्यास Account होईल रिकामे, RBIचा मोठा निर्णय
Next Article
advertisement
Gold Silver Price:  ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चांदीही महागली, एक्सपर्ट म्हणतात, 'आता...'
ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चां
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात तुफान तेजी आली आहे.

  • सोनं-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत.

  • आज, जागतिक बाजारपेठेत सध्या सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

View All
advertisement