नेट प्रॅक्टिसमध्ये रोहित शर्माची बॅटिंग पाहण्यासाठी मुंबईकरांनी तुफान गर्दी केली होती. या गर्दीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. रोहित शर्मासोबत टीम इंडियाचा माजी सहाय्यक प्रशिक्षक आणि रोहितचा खास मित्र अभिषेक नायरही सोबत होता. गर्दी आऊट ऑफ कंट्रोल होत असल्याचं लक्षात येताच अभिषेक नायर बाहेर आला आणि त्याने चाहत्यांना विनंती केली.
advertisement
रोहितला धक्का लागेल, त्याला दुखापत होईल, त्यामुळे त्याला जाऊ द्या, असं अभिषेक नायर या व्हिडिओमध्ये म्हणताना दिसत आहे. एवढी गर्दी झाल्यानंतर अखेर सुरक्षा रक्षकांना बोलवून रोहित शर्माला बाहेर काढलं गेलं, यानंतर रोहित शर्मा गाडीमध्ये बसला आणि निघून गेला.
रोहितची कॅप्टन्सी गेली
रोहित शर्मा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलनंतर पहिल्यांदाच भारताकडून मैदानात उतरणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रोहित टीम इंडियाचा कर्णधार होता, पण आता त्याची कॅप्टन्सी गेली आहे, त्यामुळे रोहित मैदानात खेळाडू म्हणूनच उतरेल. निवड समितीने शुभमन गिलला वनडे टीमची कॅप्टन्सी दिली आहे. 2027 वर्ल्ड कपच्या तयारीसाठी गिलला कर्णधार करण्यात आल्याचं निवड समितीने स्पष्ट केलं आहे. दुसरीकडे रोहित शर्मा आणि विराट कोहली वर्ल्ड कपच्या योजनांचा भाग असल्याचं गिलने सांगितलं आहे.