वरुण चक्रवर्तीने जिंकवली चॅम्पियन्स ट्रॉफी
वरुण चक्रवर्ती भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजयाचा हिरो होता. वरुणच्या मिस्ट्री स्पिनमुळे भारताने 12 वर्षांनंतर चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. वरुण चक्रवर्ती चॅम्पियन्स ट्रॉफीमधला भारताचा सगळ्यात यशस्वी तर स्पर्धेतला दुसरा सर्वाधिक विकेट घेणारा बॉलर होता. वरुणने 3 सामन्यांच्या 3 इनिंगमध्ये 9 विकेट घेतल्या, ज्यात त्याची बॉलिंग सरासरी 15.11 ची होती. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या एका सामन्यात वरुणने 5 विकेटही घेतल्या.
advertisement
यशाचं क्रेडिट रोहितला
चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये मिळालेल्या या विजयाचं श्रेय वरुण चक्रवर्तीने रोहित शर्माला दिलं आहे. मुंबईमध्ये 7 ऑक्टोबरला झालेल्या CEAT अवॉर्ड सोहळ्यात वरुण ला टी-20 इंटरनॅशनल बॉलर ऑफ द इयर देऊन गौरवण्यात आलं. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी माझी निवड होईल, असं मला वाटलं नव्हतं, पण मी रोहितचे आभार मानतो, त्याने माझ्यावर विश्वास ठेवला, तसंच त्याने मला स्वत:ला सिद्ध करण्याची संधी दिली.
मार्चमध्ये खेळली शेवटची वनडे
वरुण चक्रवर्तीने त्याची शेवटची वनडे या महिन्यात मार्च महिन्यात खेळली. चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्धची मॅच वरुणची या वर्षातली शेवटची वनडे ठरली. वरुणने त्याच्या वनडे करिअरमध्ये आतापर्यंत 4 वनडे खेळल्या, ज्यात त्याला 10 विकेट मिळाल्या आहेत, पण यातल्या 9 विकेट त्याने एकट्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येच घेतल्या आहेत.
वरुण चक्रवर्तीची ऑस्ट्रेलियाच्या वनडे सीरिजमध्ये निवड झालेली नाही, पण टी-20 सीरिजसाठी त्याला संधी देण्यात आली आहे. वरुण चक्रवर्तीने नुकत्याच झालेल्या आशिया कपमध्येही चांगली कामगिरी केली होती. या कामगिरीच्या जोरावर वरुण चक्रवर्ती आयसीसीच्या टी-20 क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.