कॅच घेताना सुदर्शनला दुखापत
दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी कॅच घेताना सुदर्शनला दुखापत झाली होती. बीसीसीआयचे म्हणणं आहे की सुदर्शनची दुखापत गंभीर नाही आणि खबरदारी म्हणून त्याला मैदानात उतरवण्यात आलं नाही. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाकडून त्याच्यावर सतत देखरेख केली जात आहे, अशी माहिती समोर आली आहे.
फॉरवर्ड शॉर्ट लेगवर साई सुदर्शन
advertisement
वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावातील आठव्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर रवींद्र जडेजाने जॉन कॅम्पबेलला बॉल टाकला. कॅम्पबेलने एक शानदार स्लॉग स्वीप शॉट खेळला. बॉल फॉरवर्ड शॉर्ट लेगवर साई सुदर्शनकडे गेला. सुदर्शनने बॉल त्याच्या हेल्मेट, हात आणि छातीमध्ये अडकवला. या शानदार कॅचमुळे फलंदाज कॅम्पबेल, समालोचक आणि चाहते स्तब्ध झाले. बीसीसीआयने सुदर्शनच्या दुखापतीची पुष्टी केली आहे.
518 धावांवर डाव घोषित
दरम्यान, सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताने 5 बाद 518 धावांवर आपला डाव घोषित केला. वेस्ट इंडिजची फलंदाजी पुन्हा एकदा अडचणीत आली आहे. तिसऱ्या दिवशी दुपारच्या जेवणाच्या वेळेपर्यंत त्यांनी 217 धावांवर आठ विकेट गमावल्या होत्या. संघाने 175 धावांवर आठ विकेट गमावल्या होत्या.