सातारा : दक्षिण आफ्रिका येथे झालेल्या कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये साताऱ्याच्या धावपटूंनी उत्तुंग यश मिळवलंय. 86 किलोमीटरची ही मॅरेथॉन डर्बन या शहरात चालू होऊन पीटरमारिट्झबर्ग या शहरामध्ये संपते. जगभरातून 24 हजार स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी होतात. भारतभरातून सहभागी झालेल्या 323 स्पर्धकांमध्ये 36 जण सातारकर होते. पूर्णपणे डोंगरदर्यातून होणारी ही मॅरेथॉन अतिशय खडतर मानली जाते. साताऱ्यातील 9 जणांनी ही मॅरेथॉन यशस्वीरित्या पूर्ण केली. यामध्ये एका प्राथमिक शिक्षेकचा समावेश असून अलमास मुलाणी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.
advertisement
प्राथमिक शिक्षिकेची कौतुकास्पद कामगिरी
सातारा जिल्ह्यात प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत असणाऱ्या अलमास मुलाणी यांनी फिटनेससाठी धावण्यास सुरुवात केली. त्यांनी अनेक मॅरेथॉनमध्ये भाग घेतला. 21 किलोमीटर, 42 किलोमीटर, अल्ट्रा मॅरेथॉन म्हणजे 50 किलोमीटर आणि या वरच्या देखिल मॅरेथॉन स्पर्धेमध्ये भाग घेऊन त्यांनी त्या यशस्वीरित्या पार केल्या आहेत. त्यामध्ये त्यांनी पारितोषिक देखील मिळवले आहेत. आफ्रिकेतील कॉम्रेडस येथे होणाऱ्या मॅरेथॉनमध्ये भाग घेण्याची खूप इच्छा होती. त्यामुळे 9 जूनला ही स्पर्धा झाली. त्यामध्ये भाग घेतला आणि ती यशस्वी रित्या पूर्ण केले, असे मुलाणी यांनी सांगितले.
प्रसिद्ध चहावाला! दिवसाला करतो 2 हजारांहून अधिक चहाच्या कपांची विक्री, कमाई पाहून व्हाल थक्क
भारतीय धावपटूंत 5 वा क्रमांक
आफ्रिकेतील कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये भाग घेण्यासाठी जगातील हजारो मॅरेथॉन धावपटू भाग घेतात. यावर्षी 22 हजार मॅरेथॉन धावकांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. विशेष म्हणजे भारतातून 323 स्पर्धक सहभागी झाले होते. प्राथमिक शिक्षक असलेल्या अलमास मुलाणी यांनी या स्पर्धेत विक्रमी कामगिरी केली. भारतातील धावपटूंमध्ये त्यांनी पाचव्या क्रमांकावर ही मॅरेथॉन पूर्ण केली. विशेष म्हणजे कॉम्रेड मॅरेथॉन पूर्ण करणाऱ्या साताऱ्यातील 9 धावपटूंमध्ये अलमास या एकमेव महिला धावपटू आहेत. 11 तास 8 मिनिटांमध्ये ही खडतर अशी मॅरेथॉन त्यांनी पूर्ण केली आहे.
सातारच्या संग्रहालयात शिवकालीन 140 शस्त्रांच्या खजिन्याची भर! इतिहासप्रेमींसाठी पर्वणी
कशी असते कॉम्रेड मॅरेथॉन?
कॉम्रेड मॅरेथॉन ही स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत होते. पहिल्या महायुद्धामध्ये शहीद झालेल्या सैनिकांच्या स्मृतीप्रित्यर्थ या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. यंदा या स्पर्धेचं 97 वे वर्ष आहे. पहाटेच्या थंडीमध्ये ही मॅरेथॉन चालू होते. पाच मोठे डोंगर आणि 25 हून अधिक लहान डोंगर पार करत ही मॅरेथॉन 87 किलोमीटरला संपते. या स्पर्धेचा रनिंग ट्रॅक 1800 मीटर उंच चढउतारांचा आहे. ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी 12 तासाचा कट ऑफ टाईम दिला जातो. जगातील अतिशय खडतर समजल्या जाणाऱ्या मॅरेथॉनमध्ये ही मॅरेथॉन गणली जाते.
"माझं यश एकटीचे नसून यामध्ये मला मार्गदर्शन करणारे कोच मनोज चव्हाण, माझे कुटुंबीय तसेच मला आर्थिक पाठबळ देणाऱ्या अनेक संस्था, माझ्या मित्र मैत्रीनी आहेत. या सर्वांनी मला सहकार्य केले त्यामुळे मी यश मिळू शकले. त्यामुळे मी त्यांची खूप ऋणी आहे, असं देखील अलमास यांनी सांगितलं.





