IND W vs SA W Final : वर्ल्ड कप फायनलआधी टीम इंडियाची कॅप्टन बदलली, हरमनप्रीत कौरला धक्का! पाहा Video
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
IND W vs SA W World Cup 2025 Final : टीम इंडियाच्या मिटिंगवेळी एक चिमुकली टीम इंडियासोबत आली. त्यावेळी जेमिमाने तिला टीम इंडियाची कॅप्टन म्हणून घोषित केलं.
ICC Womens World Cup final 2025 : आयसीसी वुमेन्स वनडे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये इंडिया वुमेन्स आणि साऊथ अफ्रिका वुमेन्स संघ एकमेकांविरुद्घ लढणार आहे. रविवार, 2 नोव्हेंबर रोजी नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर होणाऱ्या या महाअंतिम सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात वर्ल्ड कपच्या किताबासाठी कडवी झुंज पहायला मिळणार आहे. अशातच फायनलपूर्वी टीम इंडियाची कॅप्टन बदलण्यात आली आहे. त्यामुळे हरमनप्रीत कौरला धक्का बसलाय की काय? असा सवाल विचारला जात आहे.
टीम इंडियाची कॅप्टन म्हणून घोषणा
टीम इंडियाच्या मिटिंगवेळी एक चिमुकली टीम इंडियासोबत आली. त्यावेळी जेमिमाने तिला टीम इंडियाची कॅप्टन म्हणून घोषित केलं. जसं राष्ट्रगीत संपलं तशी ती चिमुकली माझ्याजवळ आली. ती म्हणाली मी तुम्हाला मिठी मारू शकते का? त्यानंतर मी तिला होकार दिला. त्यावेळी तिने मला एक वाक्य म्हटलं, ते ऐकून मला आश्चर्य वाटलं. तेव्हा मी तिला म्हटलं की, तू हे आमच्या टीमसमोर म्हणू शकते का? तिने लगेच होकार दिला. ऑस्ट्रेलिया नक्कीच चांगली खेळली पण टीम इंडिया नक्कीच ऑस्ट्रेलियापेक्षा चांगली खेळली, असं या चिमुकलीने टीम इंडियाच्या पोरींसमोर म्हटलं. तिचं हे वाक्य ऐकून सर्व खेळाडू आनंदी आणि उत्साही झाले, असं हरमनप्रीत कौर म्हणाली.
advertisement
advertisement
मला खूप आनंद झालाय
टीम इंडियाची कामगिरी पाहून मला आश्चर्य वाटलं. मला वाटलं नव्हतं मी कधी संपूर्ण संघासोबत बोलू शकेल. त्यांना भेटू शकेल. सर्व प्लेयर्स मला भेटले. त्यामुळे मला खूप आनंद झालाय, असं चिमुकली म्हणताना दिसली. टीम इंडियाच्या खेळाडूंसोबत बोलताना या चिमुकलीच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावेना झाला होता.
advertisement
फायनलसाठी राखीव दिवस
दरम्यान, भारत-दक्षिण आफ्रिका सामना रविवारी पावसामुळे थांबवल्यास सोमवारी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. मात्र, सोमवारीही 50 टक्क्यांहून अधिक पावसाची शक्यता असल्याने सामन्याची ओव्हर कमी करावी लागली तरी सामना रविवारीच पूर्ण करावा असा अंपायर्सचा प्रयत्न असेल.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 01, 2025 10:40 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND W vs SA W Final : वर्ल्ड कप फायनलआधी टीम इंडियाची कॅप्टन बदलली, हरमनप्रीत कौरला धक्का! पाहा Video


