काय म्हणाला शाहिद आफ्रिदी?
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्षपद आणि पाकिस्तानचे गृहमंत्रीपद ही दोन अतिशय महत्त्वाची पदे आहेत. या पदावर काम करण्यासाठी वेळ द्यावा लागतो. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि गृहमंत्रालय हे दोन्ही विभाग पूर्णपणे वेगवेगळे आहेत. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि राजकारण यापैकी एक काहीतरी निवडा, असं म्हणत शाहिद आफ्रिदीने मोहसिन नक्वीवर टीका केली आहे.
advertisement
चांगल्या आणि सक्षम सल्लागारांची गरज
क्रिकेटला चांगल्या आणि सक्षम सल्लागारांची गरज आहे, जे खेळाचे बारकावे समजून घेतात. नक्वी केवळ सल्लागारांवर अवलंबून राहून पीसीबी चालवू शकत नाहीत. अन्यथा त्याचं भविष्य आणखी अंधकारमय होईल, असं म्हणत शाहिद आफ्रिदीने मोहसिन नक्वी यांना इशारा दिला आहे.
पीसीबी चालवायचे असेल तर....
नक्वीने शक्य तितक्या लवकर निर्णय घ्यावा. जर त्यांना राजकारण करायचे असेल तर त्यांनी पीसीबी सोडले पाहिजे. जर त्यांना पीसीबी चालवायचे असेल तर त्यांनी राजकारण आणि सत्तेपासून स्वतःला दूर ठेवले पाहिजे, असं देखील शाहिद आफ्रिदी म्हणाला आहे.
आशियाई क्रिकेट कौन्सिलची दुबईत बैठक
दरम्यान, आशियाई क्रिकेट कौन्सिलची दुबईत बैठक झाली. या बैठकीसाठी बीसीसीआयकडून राजीव शुक्ला (Rajeev Shukla) आणि आशिष शेलार (Ashish Shelar) ऑनलाईन उपस्थित होते. यावेळी राजीव शुक्ला यांच्यासह आशिष शेलार यांनी मोहसीन नक्वीला चांगलाच जाब विचारला. त्यामुळे आशियाई क्रिकेट कौन्सिलच्या बैठकीतही जोरदार राडा झाल्याची माहिती समोर आली होती.