सात डावांमध्ये 147 धावा
शुभमन गिलचा हा जिगरी मित्र दुसरा तिसरा कुणी नसून साई सुदर्शन आहे. साई सुदर्शनचे आकडे टीम इंडियाची चिंता वाढवणारे आहेत. त्यामुळे खास शुभमन गिलने साईला नेट्समध्ये बॅटिंगचं स्किल शिकवलं. पुढील आठवड्यात 24 वर्षांचा होणारा सुदर्शनने आतापर्यंत सात डावांमध्ये 147 धावा केल्या आहेत, ज्यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. त्यामुळे साईचा फॉर्म सध्या चिंतेचा विषय नक्कीच म्हणावा लागेल. मात्र, साई सुदर्शन नक्कीच टेस्ट क्रिकेटमध्ये कमाल करू शकतो.
advertisement
साईच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास
भारताचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोइशेटे यांनी साई सुदर्शनला खेळवण्याबाबत संकेत दिले आहेत. त्यांनी सांगितलं की, भारतीय कर्णधार शुभमन गिल आणि संघ व्यवस्थापनाला साई सुदर्शनच्या कसोटी संघात स्थान मिळवण्याच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे. मला खात्री आहे की सुदर्शनला आमचा पूर्ण पाठिंबा आहे आणि त्याला हे माहित आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत त्याच्या धावसंख्येत मोठी खेळी जोडण्याचा प्रयत्न करेल जेणेकरून तो कसोटी संघात आपले स्थान टिकवून ठेवू शकेल.
स्वत:ला सिद्ध करण्यासाठी किती संधी?
दरम्यान, शुभमन गिल आणि साई सुदर्शन दोघंही आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सकडून खेळतात. दोघांची बॅटिंग स्ट्रेन्थ देखील एकमेकांना माहिती आहे. अशातच आता इतर खेळाडू बेंचवर बसून असताना साईला स्वत:ला सिद्ध करण्यासाठी किती संधी दिल्या जातील? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.