श्रीलंका दौऱ्यात संजूला आम्ही....
संजू बद्दल बोलायचं झालं तर, तो जेव्हा टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये आला तेव्हा त्याला ओपनिंगची संधी मिळाली. पण आता ओपनिंगची संधी गेली आहे. शुभमनला ओपनिंगमध्ये खेळत आहे. संजूने ओपनिंग करत असताना खूप चांगली कामगिरी केलीये. पण श्रीलंका दौऱ्यात शुभमन गिल ओपनिंगला आल्यावर संजूला संधी देण्याचा निर्णय घेतला आणि संजू कोणत्याही क्रमांकावर खेळण्यासाठी तयार झाला. खेळाडू कोणत्याही क्रमांकावर खेळण्यासाठी तयार असल्याचं पाहून नक्कीच आनंद झाला, असं सूर्यकुमार यादव म्हणाला.
advertisement
आमच्या संघाची ताकद...
तीन नंबरच्या खेळाडूपासून ते सहानंबरच्या खेळा़डूपर्यंत मी सगळ्यांना सांगितलंय की, तुम्ही कोणत्याही क्रमांकावर खेळण्यासाठी फ्लेक्झिबल असलं पाहिजे. सलामीवीर खेळाडू सोडून.., असं म्हणत सूर्यकुमारने नवा फॉर्म्युला सांगितला आहे. शुभमन गिल आणि संजू सॅमसन आमच्या संघाची ताकद आहेत. त्या दोघांना खेळताना पाहणं आनंददायी असतंय. दोघं त्यांचा रोल चांगल्या प्रकारे निभावत आहेत. एक ओपनिंग करेल आणि दुसरा मिडल ऑर्डरमध्ये खेळेल, असंही सूर्यकुमार यादव म्हणाला.
शुभमनमुळे संजूची कोंडी
दरम्यान, बीसीसीआयने शुभमन गिलला व्हाईस कॅप्टन म्हणून जाहीर केलं आहे. त्यामुळे शुभमन गिलला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवणं जमणार नाही. त्यामुळे शुभमनसाठी ओपनिंगचा स्लॉट उपलब्ध असणार आहे. याचा फटका संजू सॅमसनला बसला आहे. संजूची शुभमनमुळे घसरगुंडी झाली असून तो आता मिडल ऑर्डरमध्ये खेळताना दिसतोय.
