कोण आहे मालती चहर?
मालती चहर ही फक्त दीपक चहरची बहीण नाही तर अभिनेत्री आणि दिग्दर्शिकादेखील आहे. मालती चहर सदा विया होया जी (2022), 7 फेरे ए ड्रीम हाऊसवाइफ (2024) आणि जीनियस (2018) यासारख्या चित्रपटांमध्ये होती.
मालतीने अनेक सौंदर्य स्पर्धा आणि मॉडेलिंग स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. 2009 मध्ये तिने मिस इंडिया अर्थचा किताब जिंकला आणि 2014 मध्ये फेमिना मिस इंडिया स्पर्धेत ती दुसरी उपविजेती ठरली. 2017 मध्ये तिने मॅनिक्युअर या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मालती चहर सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे आणि तिचे चाहते लक्षणीय आहेत.
advertisement
अवेज दरबार बिग बॉसमधून बाहेर
गेल्या आठवड्यात, अवेज दरबारला बिग बॉस 19 मधून बाहेर काढण्यात आले. त्याच्या बाहेर काढण्याने केवळ त्याच्या चाहत्यांनाच नाही तर त्याच्या जवळच्या मित्रांनाही धक्का बसला. एल्विश यादवसह अनेकांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आणि हा निर्णय "अयोग्य" असल्याचे म्हटले. बिग बॉसच्या घरात आपल्याबद्दल धारणा निर्माण झाली, मी महिलांबद्दल केलेल्या वक्तव्यांचा परिणाम झाल्याचं अवेज म्हणाला.