तिलकने 53 बॉलमध्ये नाबाद 69 रन केले, ज्यात 3 फोर आणि 4 सिक्सचा समावेश होता. पाकिस्तानच्या आव्हानाचा पाठलाग करायला आलेल्या टीम इंडियाची अवस्था 20 रनवर 3 विकेट अशी झाली होती, तेव्हा तिलक बॅटिंगला आला आणि यानंतर त्याने आधी संजू सॅमसन आणि मग शिवम दुबेसोबत महत्त्वाची पार्टनरशीप करून भारताला विजय मिळवून दिला.
advertisement
तिलक वर्मा जेव्हा बॅटिंगला आला तेव्हा पाकिस्तानचा विकेट कीपर मोहम्मद हारिसने त्याला स्लेज केलं. ही मुंबई नसल्याचं मोहम्मद हारिस तिलकला म्हणाला, पण तिलकने मोहम्मद हारिसच्या या स्लेजिंगवर बॅटनेच प्रत्युत्तर दिलं. आता आशिया कपच्या फायनलनंतर तिलक वर्माने पुन्हा एकदा पाकिस्तानच्या जखमेवर मीठ चोळलं आहे. 'ये मुंबई नही तो क्या हुआ, हम मुंबईवाले है', असं तिलक म्हणाला आहे. मुंबई इंडियन्सने तिलकचं हे रील सोशल मीडियावर अपलोड केलं आहे.
काय म्हणाला तिलक?
तू बॅटिंग करत होतास, तेव्हा मागून आवाज आला ही मुंबई नाही, तेव्हा तुझ्या मनात काय चाललं होतं? यावर तिलकने पाकिस्तानवर जोरदार पलटवार केला आहे. मुंबई नाही तर काय झालं, मुंबईवाला तर आहे, असं तिलक वर्मा म्हणाला आहे. मुंबई इंडियन्सने तिलक वर्माचं हे रील सोशल मीडियावर शेअर केलं आहे. तिलकचं हे रील मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
तिलक मुंबई इंडियन्सचा हुकमी एक्का
तिलक वर्मा हा त्याच्या आयपीएल पदार्पणापासूनच मुंबई इंडियन्सकडून खेळत आहे. आयपीएल 2022 साली तिलकने मुंबई इंडियन्सकडून पदार्पण केलं, तेव्हापासून तो मुंबईच्या टीमचा महत्त्वाचा भाग आहे. आयपीएलमधल्या धमाकेदार कामगिरीनंतरच तिलक वर्माची भारतीय टीममध्ये निवड झाली आहे.