TRENDING:

Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी हिरोचा झिरो झाला, क्रिकेट इतिहासातली पहिलीच घटना, लाजिरवाण्या विक्रमाची नोंद

Last Updated:

वैभव सूर्यवंशीने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात धमाकेदार कामगिरी केली आहे. वैभवच्या बॅटमधून सर्वाधिक सिक्स आणि धडाकेबाज शतक आलं, पण दौरा संपत असताना वैभवच्या नावावर लाजिरवाणा रेकॉर्ड झाला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : वैभव सूर्यवंशीने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात धमाकेदार कामगिरी केली आहे. वैभवच्या बॅटमधून सर्वाधिक सिक्स आणि धडाकेबाज शतक आलं, पण दौरा संपत असताना वैभवने अशी चूक केली, ज्याचा विचारही त्याने कधी केला नसेल. वैभव सूर्यवंशीच्या नावावर ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये लाजिरवाणं रेकॉर्ड झालं आहे. ऑस्ट्रेलिया अंडर-19 टीमविरुद्ध खेळताना दुसऱ्या यूथ टेस्टच्या दुसऱ्या इनिंगच्या पहिल्या बॉलवर वैभव आऊट झाला. याचसोबत वैभवच्या नावावर क्रिकेट इतिहासातला पहिलाच नकोसा रेकॉर्ड झाला आहे.
वैभव सूर्यवंशी हिरोचा झिरो झाला, क्रिकेट इतिहासातली पहिलीच घटना, लाजिरवाण्या विक्रमाची नोंद
वैभव सूर्यवंशी हिरोचा झिरो झाला, क्रिकेट इतिहासातली पहिलीच घटना, लाजिरवाण्या विक्रमाची नोंद
advertisement

वैभवच्या नावावर नकोसा विक्रम

वैभव सूर्यवंशी जगातला पहिला ओपनर बनला आहे, जो यूथ टेस्टच्या चौथ्या इनिंगमध्ये दुसऱ्यांदा गोल्डन डकवर आऊट झाला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या बॉलला आऊट व्हायच्या आधी वैभव याचवर्षी इंग्लंड दौऱ्यातही यूथ टेस्टमध्ये गोल्डन डकवर माघारी परतला होता. 2010 साली जो रूटही यूथ टेस्टच्या चौथ्या इनिंगमध्ये गोल्डन डकवर आऊट झाला होता. याशिवाय लाहिरु थिरिमाने, ओली रॉबिनसन हे खेळाडू एकदाच गोल्डन डकवर पॅव्हेलियनमध्ये गेले होते.

advertisement

टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाच्या अंडर-19 टीमने विजयासाठी 81 रनचं आव्हान दिलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाचा कर्णधार आयुष म्हात्रेने जलद सुरूवात केली, पण वैभव सूर्यवंशी पहिल्याच बॉलला आऊट झाला. ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर लचमंडच्या बॉलवर वैभवने मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण मिड ऑफवर कॅच देऊन तो माघारी फिरला.

वैभवची ऑस्ट्रेलियामधील कामगिरी

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शोरमा विकून महिन्याला किती कमाई होऊ शकते? प्रणयचं इन्कम पाहून तुम्ही कराल कौतुक!
सर्व पहा

वैभव सूर्यवंशीने यूथ टेस्ट सीरिजच्या 3 सामन्यांमध्ये 44.33 च्या सरासरीने 133 रन केले. यूथ वनडे सीरिजमध्ये वैभवने 41.33 च्या सरासरीने 124 रन केले. संपूर्ण ऑस्ट्रेलिया दौऱ्यात वैभवने 18 सिक्स मारल्या. इंग्लंडनंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही वैभवने त्याची छाप पाडली आहे.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी हिरोचा झिरो झाला, क्रिकेट इतिहासातली पहिलीच घटना, लाजिरवाण्या विक्रमाची नोंद
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल