रोहित, जयस्वाल, दुबे आणि रहाणे हे कमीत कमी पहिल्या दोन सामन्यांसाठी मुंबईच्या संघात असणार नाहीत कारण निवड समिती तरुण संघासोबत पुढे जात आहे. 'यशस्वीला पोटाची समस्या आहे आणि तो लवकरच बरा होईल. आम्ही विचार केला की तरुण खेळाडूंना संधी द्यायला हवी. पण जेव्हा हे खेळाडू उपलब्ध असतील, तेव्हा त्यांना संघात घेतले जाईल.
advertisement
पाटील यांनी पुढे सांगितले, पण पहिल्या दोन सामन्यांसाठी आम्ही तरुण खेळाडूंना संधी देत आहोत. ५० ओव्हरच्या या टूर्नामेंटचा एलिट डिव्हिजन २४ डिसेंबर ते ८ जानेवारी दरम्यान अहमदाबाद, राजकोट, जयपूर आणि बेंगळुरू येथे होईल. तर १२ ते १८ जानेवारी दरम्यान नॉकआउट सामने बेंगळुरूच्या 'सेंटर ऑफ एक्सीलेंस मध्ये होतील.
मुंबईला ग्रुप सीमध्ये पंजाब, उत्तराखंड, सिक्कीम, छत्तीसगड, महाराष्ट्र, गोवा आणि हिमाचल प्रदेशसोबत ठेवण्यात आले आहे. मुंबईचा संघ टूर्नामेंटच्या पहिल्या दिवशी २४ डिसेंबरला सिक्कीमशी सामना खेळेल.
