नवीन प्रवासाला सुरुवात....
आज माझ्या हृदयातून एका रोमांचक नवीन अध्यायाची सुरुवात झाली आहे, असं विराट कोहली म्हणाला. माझ्या एका नव्या आणि रोमांचक अध्यायाची सुरुवात होत आहे. त्याचा ब्रँड 'वन 8' (One 8) आता 'अॅगिलिटास' (Agilitas) सोबत एका नवीन प्रवासाला सुरुवात करत आहे, असं विराटने जाहीर केलं आहे. 'वन8' आणि 'अॅगिलिटास'साठी एक नवा प्रवास ध्येय आणि महत्त्वाकांक्षेने प्रेरित आहे. मी 'वन8' ला 'अॅगिलिटास'च्या घरी घेऊन जात आहे, असं विराट पोस्टमध्ये म्हणाला.
advertisement
टेककिंग वन 8 होम टू अॅगिलिटास
विराट कोहलीचा 'वन 8' हा लाइफस्टाइल आणि क्लोदिंग ब्रँड (clothing brand) खूप लोकप्रिय आहे. आता 'वन 8' आणि 'अॅगिलिटास' (Agilitas Sports) या दोन कंपन्या एकत्र येत असल्याने, फॅशन आणि स्पोर्टिंग वेअर (sporting wear) सेगमेंटमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे. विराट कोहलीने या भागीदारीला 'टेककिंग वन 8 होम टू अॅगिलिटास' असं नाव दिलं आहे.
विराट कोहलीचं स्टाईल स्टेटमेंट
दरम्यान, विराट कोहलीने 'वन 8' ब्रँडची सुरुवात प्यूमा (Puma) या आंतरराष्ट्रीय स्पोर्टस्वेअर कंपनीच्या भागीदारीत केली होती. प्यूमाच्या मदतीनेच या ब्रँडने भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण केली. हा ब्रँड युवा वर्गामध्ये खूप लोकप्रिय आहे, कारण तो थेट विराट कोहलीच्या स्टाईल स्टेटमेंटशी जोडला गेला आहे.
