या सोशल मीडियावरील चर्चेला उत्तर देताना विराटने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर स्पष्टीकरण दिले. तो म्हणाला, मी माझा फीड चेक करत असताना, अल्गोरिदममुळे चुकून एक इंटरॅक्शन (लाईक) नोंदवले गेले असावे. त्यामागे माझा कोणताही हेतू नव्हता. कृपया कोणतीही अनावश्यक अंदाज लावू नयेत, अशी माझी विनंती आहे. तुमच्या समजूतदारपणाबद्दल धन्यवाद.
advertisement
अवनीतने ३० एप्रिल रोजी हे फोटो पोस्ट केले होते. ज्यात ती एका स्टायलिश हिरव्या टॉप आणि शॉर्ट स्कर्टमध्ये दिसत होती. चाहत्यांनी तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला. पण भारतीय क्रिकेट स्टार विराटने या पोस्टवर केलेली कथित 'लाईक' सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली. यानंतर अनेक मीम्स आणि प्रतिक्रियांचा पूर आला. ज्यात "कोहली साहेब, हे काय चाललंय?" आणि "अकाय बेटा, पापा को फोन दो" अशा कमेंट्सचा समावेश होता.
दरम्यान यानंतर विराटने त्याची पत्नी अनुष्का शर्मासाठी एक सुंदर आणि प्रेमळ वाढदिवसाचा संदेश एका खास फोटोसोबत पोस्ट केला. त्याने लिहिले, माझ्या बेस्ट फ्रेंडला, माझ्या जीवनसाथीला, माझ्या सुरक्षित स्थळाला, माझ्या अर्ध्या भागाला, माझ्या Everything ला... आम्ही तुला प्रत्येक दिवशी खूप जास्त प्रेम करतो. वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या प्रिय. या पोस्टमुळे विराटने पुन्हा एकदा चाहत्यांची मने जिंकली.
विराट आणि अनुष्काने 2017 मध्ये लग्न केले आणि ते वामिका आणि नुकताच जन्मलेला मुलगा अकाय यांचे प्रेमळ पालक आहेत. आपली प्रायव्हसी जपण्यासाठी ओळखले जाणारे हे जोडपे क्वचितच त्यांच्या एकत्र जीवनातील झलक शेअर करते. ज्याला त्यांच्या चाहत्यांकडून नेहमीच खूप प्रेम मिळते.
अनुष्का शर्मा शेवटची 'झिरो' आणि 'कला' चित्रपटातील एका छोट्या भूमिकेत दिसली होती आणि लवकरच ती पुन्हा मोठ्या पडद्यावर दिसण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, 'अलादीन' आणि 'टीकू वेड्स शेरू' मधून प्रसिद्ध झालेली अवनीत कौर तिच्या आगामी 'लव्ह इन व्हिएतनाम' आणि हॉलिवूड चित्रपट 'मिशन: इम्पॉसिबल – द फायनल रेकॉर्डिंग' मुळे चर्चेत आहे.