विद्यार्थ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव
भारत सरकारच्या युवा कार्यक्रम आणि खेल मंत्रालय अंतर्गत स्टेअर्स फाउंडेशन द्वारा 1 ते 3 डिसेंबर दरम्यान महाराष्ट्र राज्यस्तरीय क्रीड़ा स्पर्धाचं आयोजन सोलापूरच्या केगांव सिंहगड इन्टिट्यूट मध्ये केलं गेलं. ज्यात वर्धा जिल्ह्यातील आठ ते 25 वर्ष वयोगटच्या कुस्ती खेळाडू तसेच 14 ते 25 वयोगटाच्या कबड्डी खेळाडू, 12 ते 25 वयोगटातील टेनिस क्रिकेट, 14 ते 25 वयोगटातील खो-खो खेळाडू, एथलेटिक्सचे 8 ते 25 वयोगटातील खेळाडू, तसेच 14 ते 25 वयोगटातील व्हॉलीबॉल खेळाडू असे एकूण 282 खेळाडूंनी वर्धा जिल्ह्याचं प्रतिनिधीत्व केलं. या सर्व स्पर्धामध्ये खेळाडूंनी आपल्या जिल्ह्याचे नाव रोशन केले आहे. या यशामुळे विद्यार्थ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.
advertisement
सप्त खंजिरीच्या प्रबोधन परंपरेचा महाराष्ट्र सरकारकडून गौरव, कोण आहेत भाऊसाहेब थुटे?
दिल्लीत होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
वर्धा जिल्ह्यातील व्हॉलीबॉल टीम अंडर 14 बॉईज आणि गर्ल्स, अंडर 17 गर्ल्सच्या चमूने मिळून गोल्ड मेडल प्राप्त करत आपलं नाव दिल्लीतील स्पर्धेसाठी नोंदवलं आहे. तसेच व्हॉलीबॉल अंडर 19 च्या खेळाडूंनी रौप्य पदक प्राप्त केलं आहे. याव्यतिरिक्त क्रिकेट टीम, रेसलिंग, फुटबॉल मध्येही वर्धा जिल्ह्याने गोल्ड मेडल आणि सिल्वर मेडल प्राप्त केलंय.
वर्धा जिल्ह्यातील चमूनेच उत्कृष्ट कामगिरी करत गोल्ड सिल्वर आणि कांस्य पदके प्राप्त केली. विद्यार्थ्यांनी यशाचे श्रेय वर्धा जिल्हा वॉलीबॉल कोच कपील ठाकुर, सूरज ढाकरे, स्मिता बंडे, फुटबॉल कोच राजेंद्र बानमारे, क्रिकेट कोच गायकवाड़ यांना दिलंय. या स्पर्धेतील शेकडो चिमुकल्या खेळाडूंचं यश खरंच कौतुकास्पद आहे.