प्रशासनाने आधीच 2 लाख लोकांची उपस्थिती गृहीत धरून तयारी केली होती, पण मैदान व परिसरात एकूण ६ लाखांहून अधिक लोक एकत्र झाले. 32,000 प्रेक्षक क्षमतेच्या स्टेडियममध्ये जवळपास 1 लाख लोक आत शिरले, काही तर भिंती चढून, काही गेट फोडून जबरदस्तीने शिरताना दिसले.
कोण CPR देतोय, कोण Ambulance नाही म्हणून उचलून पळतोय; चेंगराचेंगरीची भयावह घटना
advertisement
एकाच गेटवर दबाव, पोलिसांची लाठीमार
स्टेडियममध्ये प्रवेशासाठी अनेक गेट्स होते, पण एका गेटवर अचानक प्रचंड गर्दी झाली. पोलिस व सुरक्षारक्षकांनी गर्दी थोपवण्याचा प्रयत्न केला, मात्र परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. अनेक लोक कोणतीही पर्वा न करता आत शिरू लागले. एका अधिकाऱ्याने सांगितले, लोक कोणत्याही किमतीवर आत जायचे ठरवूनच आले होते. त्यांनी ना गेट पाहिला ना सुरक्षा. यानंतर परिस्थिती हाताबाहेर गेली आणि पोलिसांना लाठीमार करावा लागला, ज्यामुळे एकच गोंधळ उडाला.
नाच-गाणं... आणि अचानक आलेल्या किंकाळ्या
बाहेरचा माहोल आनंदमय होता. ढोल-ताशे, फटाके, विराट कोहली आणि डु प्लेसिसच्या कटआउट्सना हार घालणे – असं सगळं सुरू होतं. पण गर्दी वाढल्यावर आणि पोलिसांच्या सुचना न ऐकता लोक स्टेडियमकडे धावू लागले. त्याचवेळी आनंदाच्या घोषणा भीतीच्या किंकाळ्यांत बदलल्या.
जखमी रुग्णालयात, पोलिसांचे आवाहन
या घटनेत जखमी झालेल्यांना तात्काळ बाऊरिंग रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयाबाहेर देखील गर्दी होत असल्याने पोलिसांनी लोकांना परिसर रिकामा करण्याचं आवाहन केलं आहे. काही व्हिडिओजमधून स्पष्ट होतं की लोक खाली पडत असूनही मागच्यांची गर्दी पुढे ढकलत होती.
प्रशासनाची चूक?
आरसीबीचा पहिला विजय आणि चाहत्यांचा वेडेपणा लक्षात घेता, प्रशासनाने फक्त 2 लाख लोकांच्या व्यवस्थेवर समाधान का मानलं, असा सवाल उपस्थित होतोय. सोशल मीडियावर आधीच मोठ्या गर्दीची शक्यता होती. तरीही वाहतूक मार्ग, पर्यायी ठिकाणं किंवा प्रवेश व्यवस्थापनाबाबत विशेष नियोजन का करण्यात आलं नाही, हा प्रश्न प्रशासनाला सतावत आहे.