श्रीलंकेचा 164 रनवर ऑलआऊट
श्रीलंकेचा या सामन्यात 45.5 ओव्हरमध्ये 164 रनवर ऑलआऊट झाला. एक्लेस्टोनने 10 ओव्हरमध्ये फक्त 17 रन देऊन 4 विकेट घेतल्या. तर नतालीने 5 ओव्हरमध्ये 25 रन देऊन 2 विकेट मिळवल्या. या ऑलराऊंड कामगिरीबद्दल नतालीला प्लेअर ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं.
इंग्लंडच्या 253 रन
या सामन्यात श्रीलंकेने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर इंग्लंडने 50 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 253 रन केल्या. नतालीच्या 117 रनशिवाय तमसिन ब्यूमोंटनेही 32 रनची खेळी केली. श्रीलंकेकडून इनोका रणवीराने 3 विकेट घेतल्या.
advertisement
पॉईंट्स टेबलमध्ये इंग्लंड अव्वल
लागोपाठ 3 सामन्यांमध्ये 3 विजय मिळवून इंग्लंड वर्ल्ड कप पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचलं आहे. तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाने 3 पैकी 2 सामने जिंकले असून त्यांचा एक सामना पावसामुळे अनिर्णित राहिला, त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या खात्यात 5 पॉईंट्स आहेत. 3 सामन्यात 2 विजय आणि एका पराभवासह भारतीय टीम तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारताप्रमाणेच दक्षिण आफ्रिकेचेही 4 पॉईंट्स आहेत, पण चांगल्या नेट रनरेटमुळे भारतीय टीम तिसऱ्या क्रमांकावर आहे.
टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाचं आव्हान
दरम्यान रविवारी टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाचं आव्हान आहे. विशाखापट्टणममध्ये दुपारी 3 वाजता या सामन्याला सुरूवात होणार आहे. याआधी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात भारताला पराभवाचा धक्का बसला होता, त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धची चूक भारताला महागात पडू शकते.