शुभमन गिलच्या चुकीमुळे द्विशतक हुकलं?
यशस्वी जयस्वालचं द्विशतक हुकलं. यशस्वी जयस्वाल 175 धावांवर रनआऊट झाला. यशस्वीच्या रुपात टीम इंडियाचा तिसरी विकेट गेली. यशस्वी 258 बॉलवर 22 फोरसह 175 धावा काढल्या. वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या दिवशी भारताने 2 बाद 318 धावांवर आपला डाव पुन्हा सुरू केला, परंतु संघाने लवकरच यशस्वीची विकेट गमावली. मात्र, शुभमन गिलच्या एका चुकीमुळे यशस्वीचं द्विशतक हुकलं असं मानलं जातंय. अशातच रोहित अन् गिल यांचा जुना व्हिडीओ व्हायरल होतोय.
advertisement
रोहित शर्माला रनआऊट, शुभमन पळाला नव्हता
सध्या सोशल मीडियावर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांचा मागील वनडे वर्ल्ड कपमधील व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शुभमन गिल याने रोहित शर्माला रनआऊट केलं होतं. रोहितने पळ म्हणून कॉल दिला होता तरी देखील शुभमन पळाला नव्हता. तर आता देखील शुभमन गिल याने रन घेतला नाही. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
ड्रेसिंग रूममध्ये शांतपणे बसला
दरम्यान, यशस्वी त्याच्या बाद झाल्यावर खूप निराश दिसत होता आणि काही काळ गिलवर रागही व्यक्त करत होता. शेवटी, तो निराश होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला आणि ड्रेसिंग रूममध्ये शांतपणे बसलेला दिसला. त्यामुळे आपलीच चूक होती, याची जाणीव त्याला झाली असावी.