दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या लंचनंतर जयस्वालने त्याचं अर्धशतक पूर्ण केलं. जयस्वालला त्याचं अर्धशतक पूर्ण करायला 82 बॉल लागले, यानंतर त्याने 145 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं.
जयस्वालने कोणासाठी 'हृदय' बनवले?
भारतीय क्रिकेट स्टार यशस्वी जयस्वालचं नाव मॅडी हॅमिल्टनशी जोडलेला आहे. टीम इंडियाचा हा ओपनर मॅडीच्या कुटुंबाच्याही जवळचा आहे. 2022 मध्ये, त्याने सोशल मीडियावर मॅडीच्या भावासोबतच आणि तिच्या संपूर्ण कुटुंबासोबत एक फोटो शेअर केला. तेव्हापासून मॅडी यशस्वीची टीम इंडिया आणि आयपीएलची बॅटिंग बघायला येते. इंग्लंडची टीम भारत दौऱ्यावर आली होती, तेव्हा जयस्वालने दोन द्विशतके ठोकली होती, तेव्हाही मॅडी स्टँडमध्ये दिसली होती. मॅडी हॅमिल्टन ही ब्रिटीश नागरिक आहे.
advertisement
मॅडी हॅमिल्टन आयपीएल दरम्यान राजस्थान रॉयल्सची जर्सी घालूनही दिसली होती. यशस्वी जयस्वाल कधीही त्यांच्या नात्याबद्दल बोललेला नाही. जयस्वालला त्याच्या नात्याबद्दल प्रश्नही विचारण्यात आला, पण त्याने या प्रश्नाचं उत्तर देणं टाळलं.